शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?
2
राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण
3
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
4
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
5
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
6
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
7
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
8
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
9
मस्ती आहे का...?; ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील...! मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा
10
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
11
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन
12
Sunita Rajwar : "मी खूप संघर्ष केला, आई-वडिलांनी..."; ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली लोकप्रिय अभिनेत्री
13
मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, महाराष्ट्रातील 'या' ६ खासदारांच्या नावांची चर्चा
14
जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका
15
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"
16
VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक
17
"हँडसम आफ्रिदी...", नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी पाकिस्तानी खेळाडूचा संवाद Viral
18
मोदी सरकारमध्ये उत्तर प्रदेशमधून कुणाकुणाला संधी? ही नावं येताहेत समोर   
19
मस्तच! रोज एक चमचा तूप खाण्याचे असंख्य फायदे; रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत अन्...
20
सावधान! Android युजर्ससाठी धोक्याची घंटा; तुमचा फोन होऊ शकतो हॅक, सरकारचा इशारा

कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण निर्माण करण्याची बाब विचाराधीन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 04, 2023 6:07 PM

महाराष्ट्र सरकारच्या स्थैर्यासाठी भराडी देवीला साकडे

महेश सरनाईक, संदीप बोडवेआंगणेवाडी (सिंधुदुर्ग) : कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी कोकण - क्षेत्र विकास प्राधिकरण निर्माण करण्याची बाब विचाराधीन आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाच्या धरतीवर मुंबई - सिंधुदुर्ग या रस्ते मार्गाचा विकास करण्यात येईल. जेणेकरुन कोकणच्या विकासाला पर्यायाने पर्यटनाला चालना मिळेल. कोकणच्या सर्वांगिण विकासाकरिता सरकार कटीबध्द असून याकरिता आपण केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन घेऊ असे सांगत भराडी देवीच्या मान्यवरांनी भक्त निवासाचा प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी आवश्यक तो निधी देऊ अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी घेवून मोठ्या भक्तीभावाने देवीची ओटी भरली. त्यानंतर देवस्थानाकडून झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, रविंद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते. यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देवून मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देवून मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र सरकारच्या स्थैर्यासाठी भराडी देवीला साकडेकेंद्रीय लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. या सरकारच्या स्थैर्यासाठी आपण भराडी देवीला साकडे घातले असून हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असा आशावाद व्यक्त करून आंगणे कुटुंबियांनी भाविकांची काळजी घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

राज्यातील जनतेला सुखी ठेवराज्यातील जनतेला, शेतकऱ्याला सुखी ठेव असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भराडी मातेला घातले. एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भराडी देवीचे दर्शन घेतले. कोराेनाच्या महामारीनंतर आता पुन्हा एकदा सर्व व्यवहार, उत्सव सुरळीत झाले आहे. मागील सहा महिन्यापूर्वी आपण जो निर्णय घेतला तो सर्वसामान्य जनतेच्या मनातील होता. हे सरकार गतीमान पद्धतीने धडाकेबाज निर्णय घेवून कार्यरत आहे.

निलरत्न बंगल्यावर घेतली नारायण राणेंची भेटमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्गात येताच सर्वप्रथम केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची त्यांच्या मालवण येथील निलरत्न बंगल्यावर भेट घेतली. त्याठिकाणी भोजनाचा आनंद घेतला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर, रवींद्र फाटक आदी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आंगणेवाडीमध्ये जावून भराडी देवीचे दर्शन घेतले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री