coronavirus : us : 'त्यांचा गावी परतण्याचा आनंद ठरला औट घटकेचा! पोलिस अधीक्षकांनी दिले परत जाण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:41 PM2020-03-28T13:41:38+5:302020-03-28T13:42:34+5:30

कोणत्याही परिस्थितीत आंतरराज्य प्रवेश दिला जाणार नाही. आपण आला तसे परत जा...

coronavirus: Return order issued by the Superintendent of Police to who came from goa | coronavirus : us : 'त्यांचा गावी परतण्याचा आनंद ठरला औट घटकेचा! पोलिस अधीक्षकांनी दिले परत जाण्याचे आदेश

coronavirus : us : 'त्यांचा गावी परतण्याचा आनंद ठरला औट घटकेचा! पोलिस अधीक्षकांनी दिले परत जाण्याचे आदेश

Next

दोडामार्ग : गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील ३४ युवक-युवती शनिवारी सकाळी दोडामार्गच्या सीमेवर दाखल झाल्या आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र हा त्यांचा आनंद औट घटकेचा ठरला. कारण या सगळ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यास सिंधुदुर्ग पोलिसांनी मनाई केली आहे. 

कोणत्याही परिस्थितीत आंतरराज्य प्रवेश दिला जाणार नाही. आपण आला तसे परत जा, असा आदेशच सिंधुदुर्ग पोलिसांतर्फे दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिले आहेत. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कठोर निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी घेतला आहे. 

अनुष्का गवस (दोडामार्ग), भक्ती गावडे (दोडामार्ग), भावना गावडे (दोडामार्ग),  शामल दळवी (दोडामार्ग) , भक्ती येडगे (दोडामार्ग), कु.रूपाली (दोडामार्ग), भगवान बोभाटे (नेमळे), ओवी बोभाटे (नेमळे ), अंकिता राऊळ (नेमळे), शुभदा राऊळ (नेमळे), स्नेहल राऊळ (नेमळे), शंकर काजरेकर (तळवडे), विष्णू सावंत (सावंतवाडी), गौरव आईर (सावंतवाडी), आशिष बोभाटे (आंबोली), करूणा भाईप (नेमळे), निशा नाईक (झाराप), प्रज्ञा मेस्त्री (कुडाळ ), रक्षंदा परब (ओरोस), चेतन परब (कणकवली), निलम खोचरेकर (कुडाळ), अपर्णा खोचरेकर (कुडाळ), रूचिता धुरी (कुडाळ), चैताली तेंडुलकर (कुडाळ), प्रणाली राणे (ओरोस), सागर नाईक (झाराप), संदेश जोशी (कुडाळ), अनंत नाईक (झाराप), वृषाली घाडी (झाराप), अर्चना घाडी (झाराप), प्रसाद पावसकर (झाराप), चैतन्य कदम (झाराप), विकास दळवी (झाराप), सायली सातार्डेकर (तळवडे) अशी या युवक-युवतींची नावे आहेत.

 

Web Title: coronavirus: Return order issued by the Superintendent of Police to who came from goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.