शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

CoronaVirus : सिंधुदुर्गात कोरोना स्वॅब चाचणीसाठीची आरटीसीपीआर मशीन उपलब्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:28 PM

कोरोना चाचणीसाठी लागणारी आरटीपीसीआर स्वॅब चाचणी मशिन ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील रेणवीय निदान प्रयोगशाळेत उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी माहिती अधिकारात मला दिली आहे. १३ ऑगस्ट २०१९ रोजी संबंधित मशीन प्राप्त झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत व प्रशासन करीत असलेली जनतेची दिशाभूल स्पष्ट झाली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात कोरोना स्वॅब चाचणीसाठीची आरटीसीपीआर मशीन उपलब्ध !पालकमंत्रांनी केली दिशाभूल ; राजन तेली यांची माहिती

कणकवली : कोरोना चाचणीसाठी लागणारी आरटीपीसीआर स्वॅब चाचणी मशिन ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील रेणवीय निदान प्रयोगशाळेत उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी माहिती अधिकारात मला दिली आहे. १३ ऑगस्ट २०१९ रोजी संबंधित मशीन प्राप्त झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत व प्रशासन करीत असलेली जनतेची दिशाभूल स्पष्ट झाली आहे.

मशीन उपलब्ध असताना पालकमंत्री संबधित मशिनच्या नावाखाली १ कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गवासीयांच्या जिवीताशी खेळू नये. असा सल्ला भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिला आहे.कणकवली येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, पालकमंत्री व आरोग्य विभाग बनवाबनवी करत असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.

रेणवीय निदान ही प्रयोगशाळा जिल्हा रुग्णालयासमोर आहे. असे असताना आरटीपीसीआर मशीनबाबत पालकमंत्री आणि आरोग्य यंत्रणा लपवाछपवी का करतेय ? कोविड चाचणी प्रयोगशाळेसंदर्भात पालकमंत्र्यांनी दावा करत विरोधी पक्षावर आरोप केले होते.

यासंदर्भात आपण केंद्रिय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये १५ मे २०२० रोजी माहिती मागविली होती. त्यातील सिंधुदुर्गात आरटीसीपीआर स्वॅब मशीन जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना आरटीपीसीआर मशीन जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग येथे उपलब्ध नसून ती जिल्हा रूग्णालयाच्या आवारातील रेणवीय निदान प्रयोगशाळा सिंधुदुर्ग येथे उपलब्ध असल्याचे उत्तर देण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे संबधित आरटीसीपीआर स्वॅब मशीन जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्गाच्या आवारातील रेणवीय निदान प्रयोगशाळा येथे १३ ऑगस्ट २०१९ रोजी प्राप्त झाली आहे. आरटीपीसीआर मशीनद्वारे मानवी विषाणूजन्य रोगजनकाचे परिणाम व जीनोटायपिंगसाठी वापरले जात असल्याची माहिती देताना कोरोनाचे स्वॅब हे एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनातून तपासणीसाठी नेलेले असल्याने त्यावरील होणारा खर्च हा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथील आयुक्ताकडून केला जात असल्याची माहिती शासकीय माहिती अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक वर्ग १ डॉ. एस. एच. पाटील यांनी दिली आहे.पूर्वी पासून स्वॅब चाचणी मशीन उपलब्ध असल्याचे आम्ही सांगत होतो . मात्र, पालकमंत्र्यांनी संबधित मशीन माकडतापासाठी आली असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. ही मशीन चालू होण्यासाठी आणखी काही मशीनची आवश्यकत्ता असून निदान आतातरी पालकमंत्र्यांनी गांभिर्याने या प्रश्नाकडे पाहावे.

शासनाची मशीन सुरू करण्याची मानसिकता असली तरीही पालकमंत्र्यांची मात्र मानसिकता दिसत नाही. सिंधुदुर्गात ३० तर रत्नागिरीत कोरोना रूग्णांनी २०० चा टप्पा पार केला आहे. जवळपास ७५ हजारपेक्षा जास्त परजिल्ह्यातील लोक सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. अशा लोकांची म्हणावी तशी नोंदही ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे या कोरोनावर मात करायची असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. पालकमंत्र्यांनी आतातरी पक्षभेद विसरून राजकारण बाजूला ठेवत सर्वांना विश्वासात घ्यावे .चाकरमानी सिंधुदुर्गात येण्यास आमचा विरोध नाही. मात्र , त्यांची सोय होण्यासाठी प्रयत्न करा. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्या असून सिंधुदुर्गात जिल्हापरिषद आणि हिवताप विभागाच्या ५२३ पदे रिक्त आहेत. प्रथम पालकमंत्र्यांनी ही रिक्त पदे भरावीत.

केवळ प्रसिद्धी माध्यमांपुढे खोटे दावे करू नयेत. कोरोनाच्या संकटाला केवळ व्हीडीओ कॉन्फरन्सने तोंड देता येणार नाही . तर प्रथम कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करावी. जर ते तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला सांगा. आपले अपयश मान्य करा . आम्ही प्रयोगशाळा सुरू करतो, असेही राजन तेली यावेळी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली