CoronaVirus: कणकवलीतल्या 'त्या' सहा जणांचे रिपोर्ट आले; नितेश राणे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 05:52 PM2020-03-30T17:52:42+5:302020-03-30T17:58:42+5:30

नडगिवातल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आले असून, ते आता निगेटिव्ह आले आहेत.

CoronaVirus: 6 samples who had come in contact with the positive person testing have come negative vrd | CoronaVirus: कणकवलीतल्या 'त्या' सहा जणांचे रिपोर्ट आले; नितेश राणे म्हणाले...

CoronaVirus: कणकवलीतल्या 'त्या' सहा जणांचे रिपोर्ट आले; नितेश राणे म्हणाले...

Next

खारेपाटण :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील नडगिवे येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आरोग्य खात्याने तात्काळ दखल घेऊन घरोघरी जाऊन व्यक्तिगत प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला होता. विशेष म्हणजे नडगिवातल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आले असून, ते आता निगेटिव्ह आले आहेत. कणकवलीचे आमदार नितेश राणेंनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.  विशेष म्हणजे नडगिव्यात रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाचे पथक कार्यरत झाले होते. २७ मार्चला नडगिवे येथील सुमारे ३ किलोमीटरचा परिसर सिल करण्यात आला होता.

नडगिव्यातील त्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर नितेश राणेंनी जिल्हा वैद्यकीय टीमच्या कामाला सलाम केला. यामध्ये बांबरवाडी, गुंडयेवाडी, धावडेवाडी, मधलीवाडी, वाणीवाडी, गावठणवाडी, धुरेभाटलेवाडी, बौद्धवाडी, देऊळाडी, गावठणवाडी, शिक्षक कॉलनी, घोरपीवाडी तर रामेश्वरनगर खारेपाटण, वारगांव रोडयेवाडी, वारगाव मांडवलकरवाडी, वारगाव धावडेवाडी आदी १९ वाडीवस्त्यांच्या मिळून १९ कर्मचारी व ४ नोडल ऑफिसर यांनी मिळून सुमारे ३००० लोकसंख्येचा सर्व्हे केला, तर २८ मार्च २०२० रोजी आरोग्य विभागाच्या वतीने ७ किलोमीटरचा परिसर सिल करून सर्व्हे करण्यात आला.

यामध्ये खारेपाटण कोंडवाडी, राऊतवाडी, कर्लेवाडी, कोष्टीवाडी, बौद्धवाडी, पंचशीलनगर, देऊळवाडी, जैनवाडी, भैरीवाडी, संभाजीनगर, खारेपाटण गुरववाडी, कासारवाडी, टाकेवाडी, खारेपाटण काजिर्डे काझीवाडी, खारेपाटण बंदरगाव-बंदरवाडी, खारेपाटण शिवाजीपेठ-बाजारपेठ त्याचबरोबर वारगाव-वरची सुतारवाडी, खालची सुतारवाडी, काणेकरवाडी, बौद्धवाडी, नरवाडी, धुमकवाडी, पवारवाडी अशा मिळून एकूण २५ भागातील ९३६ घरे व १०२९ कुटुंबातील एकूण ४०८९ लोकसंख्येच्या नागरिकांचा सर्व्हे २३ कर्मचारी अधिक ३ नोडल ऑफिसर यांनी मिळून केला होता.

यामध्ये आरोग्यसेवक सहाय्यिका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी सर्व्हे करण्यासाठी मदत केली. तर नोडल ऑफिसर म्हणून संकिता पाटणकर, शीतल नेवरेकर, संभाजी करलकर, मंजिरी बावकर हे काम पाहत आहेत. तर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम या संपूर्ण आरोग्य पथकाच्या प्रमुख असून, संपूर्ण परिस्थितीवर त्या लक्ष ठेवून आहेत. खारेपाटण बाजारपेठ पुढील काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. खारेपाटण शहराबरोबरच नडगिवे गावातसुद्धा कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.

Web Title: CoronaVirus: 6 samples who had come in contact with the positive person testing have come negative vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.