शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

Corona vaccine Sindhudurg :  सिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसींचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 1:57 PM

Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या १७ हजार व कोवॅक्सीनच्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस आज उपलब्ध झाले आहेत,अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसींचा पुरवठामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना, आमदार वैभव नाईक यांची माहिती

कुडाळ  : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या १७ हजार व कोवॅक्सीनच्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस आज उपलब्ध झाले आहेत,अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ज्यादा कोविड लसी पुरविण्याची मागणी मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाचे सचिव रामा स्वामी यांना सिंधुदुर्गसाठी ज्यादा लसींचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण २० हजार लसीचे डोस आज उपलब्ध झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यापूर्वी दरवेळी सुमारे चार हजार कोविड लसींचा पुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांना कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी लसींची कमतरता भासत होती.यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा गोंधळ उडत होता.

आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे याकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी कोविशिल्डच्या १७ हजार व कोवॅक्सीनच्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग