Corona vaccine : जिल्ह्यात 1 लाख 35 हजार जणांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 07:24 PM2021-05-22T19:24:02+5:302021-05-22T19:25:19+5:30

Corona vaccine : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 558 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

Corona vaccine - 2,000 people vaccinated in Kolhapur district on Saturday | Corona vaccine : जिल्ह्यात 1 लाख 35 हजार जणांनी घेतला पहिला डोस

Corona vaccine : जिल्ह्यात 1 लाख 35 हजार जणांनी घेतला पहिला डोस

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात 1 लाख 35 हजार जणांनी घेतला पहिला डोसकोविशिल्डच्या 200 लसी आणि कोवॅक्सीनच्या 80 लसी शिल्लक

सिंधुदुर्ग : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 558 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 9 हजार 569 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 638 जणांनी दुसरा डोस घेतला.  7 हजार 912 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 204 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 59 हजार 364 व्यक्तींनी पहिला डोस तर 21 हजार 432 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

45 वर्षावरील 46 हजार 261 नागरिकांनी पहिला डोस तर 5 हजार 975 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 73 हजार 807 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 69 हजार 890 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 29 हजार 280 लसी या कोविशिल्डच्या तर 40 हजार 610 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 34 हजार 848 कोविशिल्ड आणि 38 हजार 959 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 73 हजार 807 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 हजार 400 लसी असून त्यापैकी 370 कोविशिल्डच्या तर 1 हजार 30 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 280 लसी शिल्लक असून त्यामध्ये कोविशिल्डच्या 200 लसी आणि कोवॅक्सीनच्या 80 लसी शिल्लक आहेत.

Web Title: Corona vaccine - 2,000 people vaccinated in Kolhapur district on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.