corona in sindhudurg -डामरे-कानडेवाडी कंटेन्मेंट झोन जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:03 IST2020-05-25T12:03:17+5:302020-05-25T12:03:56+5:30
कणकवली तालुक्यातील डामरे गावातील कानडेवाडी येथे चार जण कोरोनाबधित आढळले आहेत. ते १४ मे रोजी मुंबईहून डामरे गावात आले होते.

corona in sindhudurg -डामरे-कानडेवाडी कंटेन्मेंट झोन जाहीर
कणकवली : तालुक्यातील डामरे गावातील कानडेवाडी येथे चार जण कोरोनाबधित आढळले आहेत. ते १४ मे रोजी मुंबईहून डामरे गावात आले होते.
गावी आल्यानंतर त्यांनी कानडेवाडी येथील घरी मुक्काम केला होता. त्यानंतर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. गावातील घरी मुक्काम केल्यामुळे संपूर्ण कानडेवाडी कंटेन्मेंट करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली घेतला आहे.
दरम्यान, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील आढळलेल्या कोरोनाबधित महिलेसोबतचे १५ सहप्रवासी कासार्डे येथे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. त्या सर्व प्रवाशांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली .