शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

आचरेकर बंधूंना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:04 AM

सिंधुदुर्गनगरी : मालवण बंदर जेठी येथे फिरण्यास आलेल्या मोहित झाड, नीतेश वाईरकर यांना पूर्ववैमनस्यातून खून करण्याच्या इराद्याने जबर मारहाण ...

सिंधुदुर्गनगरी : मालवण बंदर जेठी येथे फिरण्यास आलेल्या मोहित झाड, नीतेश वाईरकर यांना पूर्ववैमनस्यातून खून करण्याच्या इराद्याने जबर मारहाण करणाऱ्या सतीश रामचंद्र आचरेकर व रोहन रामचंद्र आचरेकर या बंधूंना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी पाच वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.मालवण बंदर जेठी येथे १ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता मोहित मिलिंद झाड व नीतेश सुरेश वाईरकर हे कुटुंबीयांसह फिरायला आले होते. ते बंदर जेठी येथील कस्टम कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आपली गाडी पार्क करीत असता आचरेकर बंधंूनी जुन्या रागातून मोहित झाड याला लाकडी बांबू, लोखंडी शिग यांनी मारहाण केली. यावेळी नीतेश वाईरकर सोडवायला गेला असता त्यालाही शिवीगाळ करून तुझा खून करतो, अशी धमकी दिली. तसेच त्यालाही हाताने मारहाण केली. याबाबातची तक्रार मोहित याची बहीण मनाली हिने मालवण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आचरेकर बंधू यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ६ जानेवारी रोजी या दोघांना अटक करण्यात आली. तर त्यानंतर न्यायालयात हजर केले असता १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी झाली. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयात पूर्ण झाली.१२ साक्षीदार तपासलेन्यायालयाने यात एकूण १२ साक्षीदार तपासले. यात स्वत: मोहित झाड, त्यांची बहीण मनाली, तहसीलदार धनश्री भालचीन यांनी घेतलेली ओळख परेड, मालवण ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पांचाळ, प्रत्यक्षदर्शी नीतेश वाईरकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. यात ३२३ व ५०४ या कलमात निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३०७ कलमाखाली दोषी ठरविण्यात आले आहे. ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी ही शिक्षा आहे. कलम ५०६ मध्ये २ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे. सरकारी पक्षाच्यावतीने तत्कालीन जिल्हा सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर व विद्यमान जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यांनी काम पाहिले.