सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:02 PM2018-12-20T13:02:39+5:302018-12-20T13:04:51+5:30

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमांमध्ये ...

Complete the target of 4856 bunds in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्णजिल्हा परिषदेचा उपक्रम : कुडाळ तालुक्यात सर्वाधिक बंधारे बांधले

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमांमध्ये ७ हजार बंधार्‍याच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ४८५६ बंधार्‍याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याची टक्केवारी ६९.३७ टक्के एवढी आहे. तसेच कुडाळ तालुक्याने उद्दिष्टापैकी जास्त बंधारे बांधले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण घटल्याने पाणीटंचाईची झळ निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा परिषदेने यावर्षी ६ हजार वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार प्रत्येक तालुक्याला जिल्हा परिषदेने उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. याचबरोबर राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या विभागांना स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याच्या एकूण ७ हजार बंधार्‍यापैकी ४८५६ एवढे बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत.

यामध्ये कणकवली तालुक्याने १००० पैकी ८४४, कुडाळ - १००० पैकी १००९, दोडामार्ग - ४०० पैकी १९४, वेंगुर्ला - ५०० पैकी ४०२, मालवण- १००० पैकी ५८५, देवगड - ९०० पैकी ५६९, सावंतवाडी - १००० पैकी ७२२, वैभववाडी - ४०० पैकी २०४ अशा एकूण ६२०० उद्दिष्टापैकी ४५२९ बंधारे बांधून ७३.५ टक्के बंधार्‍याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने ६०० बंधार्‍यापैकी १७२ कच्चे १५५ वनराई असे मिळून ३२७ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत.

सामाजिक वनीकरणाचा भोपळा फुटता फुटेना!

जिल्ह्याच्या एकूण ७ हजार बंधार्‍याच्या उद्दिष्टापैकी केवळ २०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाला देण्यात आले होते. मात्र, जिल्ह्याची वनसंपत्ती सांभाळणार्‍या सामाजिक वनीकरण विभागाने अद्याप एकही बंधारा बांधलेला नाही. या विभागाने अद्याप २०० बंधार्‍याच्या उद्दिष्टाचा भोपळाही फोडलेला नाही. हा विभाग बंधारे बांधण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात पक्के बंधारे होण्याची गरज

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे काम करून संभाव्य पाणीटंचाई रोखण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे अशा बंदरांची ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पक्के बंधारे होण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व्हे करून जिल्ह्यात जास्तीत जास्त पक्के बंधारे बांधण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Complete the target of 4856 bunds in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.