शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

टॅग लावलेल्या जनावरांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 5:51 PM

wildlife sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख १४ हजार जनावरांना पायलागचे लसीकरण आणि टॅग लावण्यात आले असून, हे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. याची माहिती ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अद्याप केवळ टॅग लावलेल्या ३९ हजार ३१० जनावरांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन समिती सभेत देण्यात आली.

ठळक मुद्देटॅग लावलेल्या जनावरांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण पशुसंवर्धन समितीची सभा : ऑनलाईन नोंद आवश्यक

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख १४ हजार जनावरांना पायलागचे लसीकरण आणि टॅग लावण्यात आले असून, हे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. याची माहिती ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अद्याप केवळ टॅग लावलेल्या ३९ हजार ३१० जनावरांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन समिती सभेत देण्यात आली.जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीची सभा सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, सदस्य रोहिणी गावडे, मनस्वी घारे, सुनील पारकर, आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील जनावरांना पायलाग लसीकरण व टॅग लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख १४ हजार जनावरांना टॅग लावणे व पायलाग लसीकरण पूर्ण केले आहे. हे काम १०० टक्के पूर्ण झाले. मात्र, टॅग लावलेल्या जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत ३९ हजार ३१० जनावरांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याचे दिसत आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली.जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरे पुरविणे, कुक्कुट पिले पुरविणे, कडबाकुट्टी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करा, अशा सूचना सभेत देण्यात आल्या. तर आंबोली पशुवैद्यकीय दवाखान्यासह जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरण्याबाबत तत्काळ कार्यवाही करा, अशी सूचना सदस्य रोहिणी गावडे यांनी केली..पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदलपशुवैद्यकीय दवाखान्यांची कामकाजाची वेळ सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ अशी होती. त्यामध्ये आता शासनाने बदल करण्याचा निर्णय घेतला असून, नवीन शासन आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४.३०, तर शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत पशुवैद्यकीय दवाखाने सुरू राहतील. अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये दुपारी १ ते १.३० ही जेवणाची वेळ असेल. असे नमूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी यांनी दिली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग