लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, २०१६ पासून सातत्याने शरीरसंबंध ठेवल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 05:09 IST2018-08-06T05:09:00+5:302018-08-06T05:09:13+5:30

वायरी येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी शहरानजीक गावातील पीडित युवतीने पोलिसात धाव घेतली.

Complaint of rape, continuous correlation with 2016 from marriage bait | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, २०१६ पासून सातत्याने शरीरसंबंध ठेवल्याची तक्रार

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, २०१६ पासून सातत्याने शरीरसंबंध ठेवल्याची तक्रार

मालवण : वायरी येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी शहरानजीक गावातील पीडित युवतीने पोलिसात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पर्यटन व्यावसायिक असलेल्या संशयित केदार मिलिंद झाड याच्यावर बलात्कार, मारहाण तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने शनिवारी रात्री दिली.
दरम्यान, मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर संशयिताला बेड्या ठोकण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी पोलीस पाठविले होते. मात्र तो सापडून आला नाही. केदार हा सिंगापूरला गेल्याचे सांगण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर मालवणात एकच खळबळ उडाली. कारण, संशयित केदार हा विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित युवतीची केदारशी २०१६ साली ओळख झाली. त्यानंतर काही महिन्यांत ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मैत्रीत प्रेमाच्या आणाभाका सुरू असताना केदार याने मैत्रीचा फायदा उठवत ११ एप्रिल २०१६ रोजी कणकवली येथे तिच्या रूमवर पहिल्यांदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे त्या तरुणीशी सातत्याने शारीरिक संबंध सुरू होते. केदारने त्यानंतर तिला विमान सफर घडवत १४ एप्रिल २०१७ रोजी तो तिला दिल्ली, कुलूमनाली येथे फिरण्यास घेऊन गेला. तेथेही त्याने तिच्याशी सातत्याने शारीरिक संबंध ठेवले, असल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Complaint of rape, continuous correlation with 2016 from marriage bait