सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय ही पेड कोविड हॉस्पिटल म्हणून चालवण्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांनी परवानगी दिलेली आहे. सदर रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत असे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोविड - 19 बाधीत रुग्णांकडून उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या बीलांची तपासणी व महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा लाभ इत्यादी बाबतची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती व तालुका स्तरावर समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आले आहे.तालुका स्तरावरील समन्वय अधिकारी पुढील प्रमाणे आहे. निवासी नायब तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी, पंचायत समिती हे अधिकारी खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापन बाबी संबंधी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. बील तपासणी अधिकारी हे रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या बीलाची तपासणी करून सदर बील अदा करणेबाबत शिफारस देतील. तसेच सदरचे बील हे विहीत दराप्रमाणे असल्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी शिफारस द्यावयाची आहे. सर रुग्णालय व्यवस्थापनाने दिलेल्या बीलावर सबंधित रुग्णाचा आक्षेप असल्यास त्याबाबत जिल्हास्तरीय समिती यांनी चौकशी करून आपला निर्णय कळविणेचा आहे. जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेली समिती पुढील प्रमाणे आहे. रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सदस्य सचिव व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांदरेकर, सदस्य, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी नितीन सावंत, सदस्य अशी समिती कार्यान्वीत करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
खाजगी रुग्णालयातील कोविड उपचाराबाबतची बील तपासणार, समिती कार्यान्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 19:19 IST
CoronaVirus Sindhdurg- जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय ही पेड कोविड हॉस्पिटल म्हणून चालवण्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांनी परवानगी दिलेली आहे. सदर रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत असे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोविड - 19 बाधीत रुग्णांकडून उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या बीलांची तपासणी व महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा लाभ इत्यादी बाबतची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती व तालुका स्तरावर समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आले आहे.
खाजगी रुग्णालयातील कोविड उपचाराबाबतची बील तपासणार, समिती कार्यान्वीत
ठळक मुद्देखाजगी रुग्णालयातील कोविड - 19 उपचाराबाबतची बील तपासणारतपासणीसाठीची समिती कार्यान्वीत