दवाखाने बंद ठेवून पश्चिम बंगालमधील त्या हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:57 IST2019-06-19T15:55:20+5:302019-06-19T15:57:01+5:30
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर मारहाण घटनेचे पडसाद सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटले. सिंधुदुर्ग डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबने आपले दवाखाने बंद ठेवून (अत्यावश्यक रूग्ण सेवा वगळून) पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना देण्यात आले. भविष्यात सर्व डॉक्टर निर्भयपणे काम करू शकतील अशा ठोस उपाययोजना शासनाने कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

पश्चिम बंगाल राज्यातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा जिल्ह्यातील डॉक्टरांनी निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर मारहाण घटनेचे पडसाद सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटले. सिंधुदुर्ग डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबने आपले दवाखाने बंद ठेवून (अत्यावश्यक रूग्ण सेवा वगळून) पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना देण्यात आले. भविष्यात सर्व डॉक्टर निर्भयपणे काम करू शकतील अशा ठोस उपाययोजना शासनाने कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, डॉ. संजय केसरे, उपाध्यक्ष डॉ़. दर्शेश पेठे, डॉ़. राजेश्वर उबाळे, सचिव डॉ़ सुहास पावसकर, माजी अध्यक्ष डॉ़. विद्याधर तायशेट्ये, कणकवली उपाध्यक्ष डॉ. गीता मोघे, इंडियन डेन्टल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित आपटे, डॉ़ निलेश पाकळे, डॉ. अमोघ चुबे, डॉ. विजय तावडे, डॉ. स्वप्नील राणे, डॉ. निलेश पेंडुरकर, डॉ. निलेश कोदे, डॉ. नंंदन सामंत, डॉ. संजय निगुडकर, डॉ. प्रशांत मडव, डॉ. अविनाश झांट्ये, डॉ. जयसिंग रावराणे आदींसह डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते़.
जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या वयोवृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना कवटीचे फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण करण्यात आली. हे डॉक्टर आजही मृत्युशी झुंज देत आहेत.
देशभरात डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. डॉक्टर अतिरिक्त ताण सहन करीत रुग्णांवर उपचार करीत असतात. अशावेळी समाजाकडून अशाप्रकारचा नकारात्मक प्रतिसाद हा वैद्यकीय क्षेत्राचे खच्चीकरण करणारा आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याचा प्रतिबंध न झाल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडून जाईल.
भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने सकारात्मक धोरण अवलंबून अशा प्रवृतींना आळा बसून जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचे धोरण अवलंबवावे अशी मागणी करण्यात आली आहे. या बंदमध्ये ६०० डॉक्टरांचा सहभाग होता.
डॉक्टरांनाही आपत्कालीन क्रमांक देण्यात यावा
जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केल्यानंतर डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर मारहाण प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर संबंधित डॉक्टर नैराश्यात जाऊ नये यासाठी पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका याप्रमाणे जिल्ह्यातील डॉक्टरांनादेखील अशाप्रकारे आपत्कालीन नंबर देण्यात यावा जेणेकरून संबंधित डॉक्टरांना तत्काळ धीर देता येईल.