कणकवलीत पथदिपांच्या जोडण्या बंद, भाजप युवा मोर्चाने कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:54 IST2022-06-17T15:54:10+5:302022-06-17T15:54:44+5:30
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पथदीप सुरु असताना कणकवलीसाठी दुजाभाव का?

कणकवलीत पथदिपांच्या जोडण्या बंद, भाजप युवा मोर्चाने कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा
कणकवली : कणकवली तालुक्यातील पथदिपांची जोडणी गेल्या महिन्यापासुन बंद आहे. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्यावतीने वीज वितरण कार्यालयास घेराव घालण्यात आला.
वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत, उप कार्यकारी अभियंता बगाड़े यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. कणकवली तालुकाच अंधारात का? जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पथदीप सुरु असताना कणकवलीसाठी दुजाभाव का? वीज जोडणी तत्काळ सुरु करा. अन्यथा येत्या सोमवारी मोठ्या संख्येने येऊन कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा उपस्थित भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी संदीप मेस्त्री यानी अधीक्षक अभियंता विनोद पाटिल यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली, पाटिल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ४८ तासात पथदीप सुरु करा. अशी मागणी यावेळी केली. १५ व्या वित्त आयोगमधून पैसे भरायचे असल्यास तोंडी नको, तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसे ग्रामपंचायतला लेखी आदेश द्यावेत. असे मेस्त्री यांनी सांगितले.
यावेळी युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री, तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, संतोष पुजारे, सुभाष मालंडकर, स्वप्निल चिंदरकर, बाबु राणे, बाबू घाडिगावकर, आनंद घाड़ी,परेश कांबळी, सुशांत राऊळ, नयन दळवी आदी उपस्थित होते.