मुख्यमंत्री किल्ले सिंधुदुर्गवर नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:39 PM2020-02-18T17:39:12+5:302020-02-18T17:40:46+5:30

दोन दिवसांच्या कोकण दौ?्यावर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. किल्ले सिंधुदुर्ग येथे देशातील एकमेव अशा शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेत कुलस्वामिनी भवानी मातेच्या मंदिरात नतमस्तक झाले. मुख्यमंत्र्यांकडून जिरेटोपही मंदिराचे विश्वस्त सकपाळ यांच्याकडे प्रदान करण्यात आला.

The chief minister bowed down at the fort Sindhudurg | मुख्यमंत्री किल्ले सिंधुदुर्गवर नतमस्तक

किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दर्शन घेत नतमस्तक झाले तर दुसऱ्या छायाचित्रात मुख्यमंत्र्यांना स्थानिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री किल्ले सिंधुदुर्गवर नतमस्तककोकणातील बेरोजगार त्यांना दुवा देतील  : जठार यांचे आवाहन

मालवण : दोन दिवसांच्या कोकण दौ?्यावर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. किल्ले सिंधुदुर्ग येथे देशातील एकमेव अशा शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेत कुलस्वामिनी भवानी मातेच्या मंदिरात नतमस्तक झाले. मुख्यमंत्र्यांकडून जिरेटोपही मंदिराचे विश्वस्त सकपाळ यांच्याकडे प्रदान करण्यात आला.

सिंधुदुर्गनगरी येथून हेलिकॉप्टरने मालवणात आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी, शहर अध्यक्ष बाबी जोगी, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब व शिवसेना पदाधिकारी यांनी स्वागत केले. त्यानंतर मालवण बंदर जेटी येथून प्रवासी बोटीतून समुद्रमार्गे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी ११ : ४५ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे दाखल झाले.

किल्ले सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री ठाकरे यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पस सदस्य मधुरा चोपडेकर, वायरी सरपंच घनश्याम ढोके, उपसरपंच संदेश तळगावकर, व सदस्य, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, रुची राऊत, अतुल रावराणे, हर्षद गावडे, मंदार गावडे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ठाकरे यांना स्थानिकांनी शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.
मुख्यमंत्र्याच्या दौ?्याच्या पार्श्वभूमीवर बोर्डिंग मैदान ते मालवण जेटी या मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पर्यटकांसाठी सकाळपासून किल्ले दर्शन तसेच पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाचा दौरा आटोपल्यानंतर पर्यटकांसाठी किल्ले दर्शन सेवा सुरू करून देण्यात आली. दरम्यान, हेलिकॉप्टरने बोर्डिंग मैदानावर उतरलेल्या मुख्यमंत्र्यांनी लगतच्या सीताबाई श्रीपाद घुर्ये नर्सरीतील चिमुकल्यांशी संवाद साधला.

मच्छिमारांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले

मालवण बंदर जेटी येथे मच्छीमार नेते महेंद्र पराडकर व अन्य मच्छीमार प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत निवेदन सादर केले. मत्स्यदुष्काळाचा गांभीयार्ने विचार व्हावा. मच्छीमारांची कर्जे माफ व्हावीत. मच्छीमार आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत. पर्ससीन व एलईडी मासेमारी बाबत अधिसूचनांची कठोर अंमलबजावणी व्हावी. यासह अन्य मागण्या मच्छीमारांनी केल्या.

 

Web Title: The chief minister bowed down at the fort Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.