शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

आंबोली महादेवगड पॉईंट येथे आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 4:45 PM

AmboliHillStation, Sindhudurgnews सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे तसेच असलेली निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पांढरकवडा वन्यजीव विभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

ठळक मुद्देआंबोली महादेवगड पॉईंट येथे आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन साजरा पर्यावरणीय घटकांचे संवर्धन महत्त्वाचे :सुभाष पुराणिक

आंबोली : सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे तसेच असलेली निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पांढरकवडा वन्यजीव विभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिनाच्या निमित्ताने महादेवगड पॉईंट आंबोली येथे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वत पूजन कार्यक्रम झाला. यावेळी पुराणिक बोलत होते.

कोकण आणि त्यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग म्हणजे जैवविविधतेचा सागर आहे. येथील सजीवसृष्टीचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज विकासाच्या नावाखाली निसर्ग संपत्तीची हानी होत आहे. वनविभाग आणि पोलीस विभाग यांच्या माध्यमातून वनसंरक्षण केले जाते. तसेच माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या माध्यमातूनही पर्यावरण संवर्धनाची चळवळ वाढण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सुभाष पुराणिक म्हणाले.

माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचा उद्घाटन समारंभ आणि आंतरराष्ट्रीय पर्वत दिन असा संयुक्त कार्यक्रम होत असून हा एक सुवर्णयोग असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सचिव एस. एन. पाटील यांनी सांगितले.

यावेळी या क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक यांच्यासह रेस्क्यू तज्ज्ञ बाबल अल्मेडा (सावंतवाडी), डॉ. बापू भोगटे (कुडाळ), रमाकांत नाईक (वेंगुर्ला), फुलपाखरू तज्ज्ञ हेमंत ओगले (आंबोली), गिर्यारोहक व पत्रकार अनिल पाटील (गोवा), पत्रकार काका भि (आंबोली) व संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नारकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

इतिहास, गिर्यारोहण आणि पर्यटन यांचा समन्वय साधून या क्षेत्रात एक चांगले काम उभे राहण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र घेऊन काम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रकाश नारकर यांनी केले. उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण यांनी आभार मानले.नांगरतास येथे रॅपलिंग, ट्रेकिंग, स्विमिंग क्रीडा प्रकारदुसऱ्या सत्रात कमलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांगरतास येथे रॅपलिंग, ट्रेकिंग, स्विमिंग, बर्डिंग व व्हॅली क्रॉसिंग इत्यादी विविध क्रीडा प्रकार करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिकांसह जिल्ह्यातील हर्षल नाडकर्णी, सदस्य डॉ. गणेश मर्गज, अतिश माईणकर, डॉ. निहाल नाईक, मायकल डिसोजा आदी सहभागी झाले होते.यावेळी उत्तम नार्वेकर, संतान अल्मेडा, राजेश आमृसकर, संदेश गोसावी, देवेश रेडकर, कोमल रेडकर, प्रथमेश धुरी, बाळकृष्ण गावडे, पवन गावडे, तुकाराम गावडे, प्रतीक गावडे, ऋतिक गावडे, दीपक कदम, राहुल चव्हाण तसेच बाबल अल्मेडा टिम, आंबोली रेस्क्यू टिम, सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर टिम व शिवप्रेमी सिंधुदुर्ग टिमचे प्रतिनिधी व निसर्गप्रेमी उपस्थित होते. 

टॅग्स :Fortगडsindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन