शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: करुळ घाटात कार ६०० फूट खोल दरीत कोसळली, दोन प्रवाशांनी मारली बाहेर उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:15 IST

अपघात की घातपात? तर्कवितर्कांना उधाण 

वैभववाडी : मृत्यू समोर उभा असताना नशिबाने साथ दिली, तर काय चमत्कार घडू शकतो याचा प्रत्यय करुळ घाटात आला. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील एक कार ६०० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, कार दरीत झेपावण्यापूर्वीच त्यातील दोघांनी बाहेर उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला असून दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.दिंडवणेपासून ५०० मीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघातातून बचावलेल्या दोघांनी स्वतः पोलिसांच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. वैभववाडी पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, 'सह्याद्री जीव रक्षक' पथकाने बुधवारी दरीत उतरून कारची पाहणी केली. मात्र, या घटनेची पोलिसांत अद्याप अधिकृत नोंद झालेली नाही.

अपघात की घातपात? तर्कवितर्कांना उधाणज्या ठिकाणावरून कार दरीत कोसळली, तिथे दोन्ही प्रवाशांना बाहेर उडी मारणे कसे शक्य झाले, असा प्रश्न प्रत्यक्षदर्शींकडून उपस्थित केला जात आहे. अपघाताची सद्य:स्थिती आणि प्रवाशांचा बचाव यावरून स्थानिक नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण असून, हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.सह्याद्री जीव रक्षक पथकाचा थरारकार ६०० फूट खोल गेल्यामुळे ती रस्त्यावरून दिसत नव्हती. गाडीत आणखी कोणी अडकले आहे का, हे तपासण्यासाठी सह्याद्री जीव रक्षक पथकाचे सदस्य दोरखंडाच्या साहाय्याने खोल दरीत उतरले. कारमधील साहित्याची तपासणी केल्यानंतर त्यात अन्य कोणीही नसल्याची खात्री करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg: Car plunges 600 feet in Karul Ghat, two survive.

Web Summary : A car fell 600 feet into a valley in Karul Ghat, Sindhudurg. Two passengers miraculously survived by jumping out before the crash. The car was destroyed, and the incident is under investigation.