शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

..मात्र तुम्ही निवडून येऊ शकणार नाही, मंत्री दीपक केसरकरांचा राजन तेलींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 11:59 AM

मी निवडणूक रिंगणात नसलो तरी दुसरी व्यक्ती पराभव करेल

सावंतवाडी : मी मंजूर केलेल्या निधीतील कामाचे कितीही नारळ फोडा पण निदान माझे नाव तरी घ्या दुसर्‍यानी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडले म्हणून तुम्ही निवडून येऊ शकणार नाही. तुमची पराभवाची हॅटट्रिक ही होणारच अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी आमदार राजन तेली याच्यावर केली. तसेच माझ्यात व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यात कोणीतरी भांडणे लावून देण्याचे काम करत आहे असा आरोपही मंत्री केसरकर यांनी केला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नितीन मांजरेकर, सचिन वालावलकर, गुड्डू जाधव आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, शिवसेना भाजप युती अभेद्य आहे. असे असताना काहीजण त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्यात व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात वाद निर्माण करण्याचा काहींनी प्रयत्न सुरू केला आहे. असे असले तरी मंत्री चव्हाण हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत त्यामुळे असे वाद निर्माण करून आम्ही एकमेकापासून लांब जाणार नाही हे लक्षात ठेवावे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत असून त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर जात आहे.मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहींना हे पटत नाही. त्यामुळे ते आमच्यात  वाद निर्माण करून स्वताची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याना इथे निवडणूक लढवायची आहे त्यांनी जरूर निवडणूक लढवावी पण आतापासूनच वाद कशाला निर्माण करता असा सवाल मंत्री केसरकर यांनी उपस्थित केला. तसेच मी आणलेल्या निधीतून काहीजण नारळ फोडण्याचे काम करतात पण ही भूमिपूजन करताना निदान माझे नाव तरी घ्या असा उपरोधिक टोलाही मंत्री केसरकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लगावला.मी निवडणूक रिंगणात नसलो तरी दुसरी व्यक्ती पराभव करेलसावंतवाडी मतदारसंघात कोणतेही काम करायचे झाले तर आमदार म्हणून माझे पत्र लागते एवढे तरी भूमिपूजन करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच हे नारळ फोडतात त्यांना कदाचित येथून पराभवाची हॅट्ट्रिक साधायची असेल जिल्हा परिषद ला पराभूत झालेले आता सावंतवाडी मतदारसंघात आले आहेत आतापर्यंत दोन वेळा येथील जनतेने पराभूत केले तरी सुद्धा तिसऱ्यांदा नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी निवडणूक रिंगणात नसलो तरी दुसरी व्यक्ती यांचा निश्चितच पराभव करेल असेही मंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Rajan Teliराजन तेली