शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली शहरात चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न, चोरटा सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 12:19 IST

थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी साधली संधी

कणकवली: कणकवली शहरात 'थर्टी फर्स्ट' च्या मध्यरात्री संधी साधत तीन बंद घरे व एक दुकान अशा चार ठिकाणी अज्ञात चोरट्याने  चोरीचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही रोख रकमेसह मुद्देमाल चोरीस गेला असला तरी सोमवारी रात्री उशिरापर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात याचोरीबाबत तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे चोरीस गेलेल्या ऐवजाचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. दरम्यान, चोरट्याने दोन ठिकाणी कोयते चोरले असल्याचे समजत असून एका शासकीय रास्त दराच्या धान्य दुकानातील १ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम लांबवली आहे. चोरटा कोयता घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचा एक व्हिडिओ कणकवली शहरात जोरदार व्हायरल होत आहे. या चोरीच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एक रास्त दराचे धान्य दुकान रविवारी मध्यरात्री २ .५४ वाजण्याच्या सुमारास चोरट्याने फोडल्याचे तेथील सीसीटीव्हीत कैद झाले आहे.तसेच जळकेवाडी येथील एका घरातील एक कोयता लंपास केला आहे. तसेच त्याच घराच्या ३ कपाटातील साहित्य विस्कटून टाकले होते. त्याचबरोबर त्या घरातील गाडी दुरुस्तीचे पाणे चोरीला गेले आहेत.बांधकरवाडी येथील एका घरात चोरीचा प्रयत्न झाला.तर मधलीवाडी येथील एका जुन्या घरातील कोयता आणि काही साहित्य चोरीला गेले. या चार ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला आहे. त्या चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा तोडत, कपाटे उचकटून चोरीचा प्रयत्न केला .या चोरीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांनी एका चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, ज्या घरात चोरी झाली,त्या घरमालकांनी कणकवली पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नसल्याने चोरीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी