शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

बजेट १ कोटीवर जाणार

By admin | Updated: March 3, 2015 21:56 IST

महिला बालकल्याण समिती सभेत माहिती

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या अंतिम सुधारीत अंदाजपत्रकात १५ लाखांची वाढ होऊन या विभागाचे बजेट सुमारे १ कोटीवर जाणार असल्याची माहिती मंगळवारी समिती सभेत देण्यात आली.जिल्हा परिषद महिला व बालविकास समिती सभा सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य वंदना किनळेकर, निकिता तानवडे, श्रावणी नाईक, रुक्मिणी कांदळगावकर, समिती सचिव तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर राष्ट्रपती पदकप्राप्त जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाचे चालू आर्थिक वर्षासाठीच्या ८२ लाख ६५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये १५ लाख ४८ हजार रुपयांची वाढ होणार असून एकूण बजेटच्या ५० टक्के निधी विविध प्रशिक्षणे आणि ५० टक्के निधी विविध साहित्य खरेदीवर खर्च करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. या विभागाचा निधी १०० टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने विविध प्रशिक्षणार्थींनी आणि योजनांचा लाभ घेणाऱ्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सभापती स्नेहलता चोरगे यांनी केले. या सभेत सायकल, शिवणयंत्र, सौर कंदिल, वजनकाटा, घरघंटी खरेदीबाबत चर्चा करण्यात आली. तर शासनाच्या दरपत्रकानुसार पुरवठादार ठरवून खरेदी करण्यास सभेत मान्यता देण्यात आली. मात्र, यापैकी कोणत्याही पुरवठादाराकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या साहित्याचे मॉडेल सभागृहात दाखविण्यात आलेले नाही. याबाबत काहींनी शंका उपस्थित करत चांगल्या दर्जाच्या वस्तूंची खरेदी करा, मागाहून तक्रारी येणार नाहीत याची खबरदारी घ्या अशी सूचना केली. (प्रतिनिधी)वस्तूच्या वॉरंटीचे काय?जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत सन २०११-१२ मध्ये पुरविण्यात आलेल्या शिवणयंत्रांबाबत संबंधित लाभार्थ्यांनी तक्रार दाखल करून ही शिवणयंत्रे निकृष्ट दर्जाची असल्याचे म्हटले आहे. तर या शिवणयंत्रांचे सुटे भाग जिल्ह्यात कोठेही मिळत नाहीत किंवा दुरुस्ती करूनही मिळत नसल्याचे म्हटले आहे. तर पुरवठादाराने या शिवणयंत्रासोबत दिलेल्या वॉरंटीकार्डवर आपले नाव, पत्ता, संपर्क नंबर किंवा वॉरंटी कालावधी न लिहिताच आपले साहित्य लाभार्थीच्या माथी मारले. त्याला आता शोधायचे कुठे? असा प्रश्न संबंधित लाभार्थींना पडला असताना आता नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या शिवणयंत्रासह सायकल, घरघंटी, सौर कंदील, घरघंटीसारख्या महागड्या वस्तूच्या वॉरंटीचे काय? त्या नादुरुस्त झाल्यास दुरुस्त कुठे होणार? आणि कोण करणार? याबाबत कोणतीही चर्चा आजच्या सभेत झाली नाही. त्यामुळे मार्चपूर्वी खरेदी होईल. निधीही खर्च होईल पण खरेदी केलेल्या वस्तूच्या वॉरंटीचे काय? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.