शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

सिंधुदुर्गात बसपा स्वबळावर लढणार, इच्छुकांच्या मुंबईत मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:14 PM

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढविणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देबसपा स्वबळावर लढणार : पी. के. चौकेकर१६ पासून इच्छुकांच्या मुंबईत मुलाखती

मालवण : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढविणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.आॅक्टोबर २०१९ मध्ये होणाऱ्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीची राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत केंद्रीय महासचिव राज्याचे प्रमुख प्रभारी आमदार रामअचल राजभर, राज्यप्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.बहुजन समाज पार्टी देशातील तीन नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे. आज या पक्षाचे लोकसभेत १० खासदार तर राज्यसभेत ५ खासदार आहेत. देशातील सर्व राज्यात पक्ष कार्यरत आहे. तरीही राज्यातील आंबेडकरवादी समविचारी पक्षांसोबत युतीसाठी प्रयत्न करूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यातील सर्वच्या सर्व २८८ जागा स्वबळावर लढविण्याचे या बैठकीत जाहीर केले.बसपा सिंधुदुर्गची बैठक नाशिक झोन प्रभारी पी. के. चौकेकर यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत जिल्हा प्रभारी सुधाकर माणगावकर, रवींद्र कसालकर, अध्यक्ष दीपक जाधव, एस. एस. विणकर, जिल्हा महासचिव विजय साळकर उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील तिन्ही जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविण्यात आले.

मुंबई, कोकण विभागातील जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात घेण्यात येणार आहेत, अशी माहिती बसपाचे नाशिक झोन प्रभारी पी. के. चौकेकर यांनी दिली.

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग