शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

मातीनाला बंधाऱ्यात युवकाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 5:36 PM

बांदा : भालावल - धनगरवाडी येथील समीर धुळू कोकरे (२१) या युवकाचा मृतदेह मातीनाला बंधाºयात संशयास्पदरीत्या आढळून आल्याने एकच ...

ठळक मुद्देमातीनाला बंधाऱ्यात युवकाचा मृतदेह आढळलाभालावल-धनगरवाडीतील घटना : संशयास्पद मृत्यूने खळबळ

बांदा : भालावल - धनगरवाडी येथील समीर धुळू कोकरे (२१) या युवकाचा मृतदेह मातीनाला बंधाºयात संशयास्पदरीत्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह गुरुवारी सकाळी लगतच्या बंधाऱ्यात आढळून आल्याची तक्रार धोंडू बाबू कोकरे यांनी बांदा पोलिसांत दिली. मृतदेह विच्छेदन अहवालात समीरचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी स्पष्ट केले. बांदा पोलिसांत याबाबच आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.बांदा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी समीर व अन्य तीन मित्रांसमवेत नजीकच्या मातीनाला बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेला होता. सायंकाळी शेजारील व्यक्तीला बोकड घरी आणताना समीरचा मोबाईल वाटेत मिळाला होता. त्यानंतर त्याने घरातील व्यक्तींना समीरचा मोबाईल मिळाल्याचे सांगितले.त्यावेळी दुपारी गेलेला समीर आंघोळीहून घरी आला नाही हे घरात व शेजाऱ्यांना समजले. स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईकांनी बुधवारी सायंकाळी बंधारा परीसरात शोधाशोध सुरू केली. उशिरा बंधाऱ्यानजीक समीरचे कपडे व चप्पल आढळून आले. रात्री उशीरापर्यत शोधाशोध करुन समीर सापडला नाही. रात्र उशीर झाल्या शोध कार्यात अडथळा आल्याने शोध कार्य थांबविण्यात आला.गुरूवारी सकाळी वाडीतील ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम राबविली. त्यावेळी बंधाऱ्यात समीरचा मृतदेह आढळून आला. या शोधकार्यात पंचक्रोशीत समाजसेवेकांनी मदत कार्यासाठी धाव घेतली.भालावल उपसरपंच समीर परब, ग्रामपंचायत सदस्य उदय परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब, तांबुळी माजी सरपंच शिवराम सावंत, माजी डेगवे उपसरपंच मधुकर देसाई, माजी उपसरपंच अशोक परब, विठु कोकरे, भागू लांबर, विलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, विठ्ठल दळवी आदींनी मदतकार्यात सहभाग दाखविला.बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. यावेळी दुपारी मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात आणण्यात आला. समीरच्या पश्चात आई-वडील, पाच बहिणी असा परिवार आहे.सायंकाळी उशीरा मृतदेहाचे विच्छेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी केले. अहवालात समीरचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे नमूद करण्यात आले. बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.कपडे, मोबाईल वेगवेगळ््या ठिकाणीसमीरच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार तो कधीही बंधाऱ्यात आंघोळीसाठी जात नसे. त्याचे कपडे, मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी सापडून आले आहेत. बंधाऱ्यात सुमारे १५ ते २० फूट खोल पाणीसाठा आहे. त्याला पोहता येत नसल्याने तो मागाहून पाण्यात आंघोळीसाठी एकटाच उतरला होता का ? असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण तो पोहण्यात तरबेज नव्हता. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग