शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सिंधुदुर्गात ४८ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा : तेलींचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:18 PM

grampanchyat bjp sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला असून आता यापुढे ग्रामपंचायतीं प्रमाणेच भाजपा जिल्हा बँक आणि तिन्ही नगरपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन करेल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला. तसेच इन्सुलीतील प्रकार म्हणजे भाजपला धक्का नसून, दोघेही सरपंच पदासाठी इच्छुक असल्याने एक बाहेर गेल्याचे तेली म्हणाले.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात ४८ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा : तेलींचा दावा इन्सुलीत दोघेही माघार घेण्यास तयार नसल्याने सत्ता गेली

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला असून आता यापुढे ग्रामपंचायतीं प्रमाणेच भाजपा जिल्हा बँक आणि तिन्ही नगरपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन करेल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला. तसेच इन्सुलीतील प्रकार म्हणजे भाजपला धक्का नसून, दोघेही सरपंच पदासाठी इच्छुक असल्याने एक बाहेर गेल्याचे तेली म्हणाले.ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, भाजप नेते अतुल काळसेकर, बड्या सावंत उपस्थित होते. तेली म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील ७० पैकी ४८ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा सरपंच बसणार आहे.तसेच अन्य काही ग्रामपंचायतीही आपल्या ताब्यात येतील, असे सूतोवाच केले होते. ते खरे ठरताना आज तीन ग्रामपंचायती अधिक ताब्यात येताना एकूण अठ्ठेचाळीस ठिकाणी भाजपची सत्ता आली असूनही काही ग्रामपंचायती गाव विकास पॅनेलकडे आहेत. ते संपर्कात असून हा आकडा अजूनही वाढेल. बुथ अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र राहून घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे.गावच्या विकासासाठी हातभार लावण्याचा प्रयत्नतेली पुढे म्हणाले, इन्सुलीमध्ये सरपंच पदासाठी दोघे जण इच्छुक असल्याने आपली सत्ता गेली. याठिकाणी आम्ही कोणालाच थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. जिल्ह्यामध्ये जे भाजपाचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले, ते नवीन चेहरे आहेत. त्यांच्याकडून गावासाठी खूप चांगले काम आम्ही करून घेऊ. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न असेल, तसेच केंद्र सरकारच्या नवनवीन योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची टीम कार्य करेल. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांना ट्रेनिंग देण्यात येईल.ग्रामपंचायत निवडणुकीतील या घवघवीत यशानंतर आता जिल्हा बँक तसेच दोडामार्ग, कुडाळ आणि वैभववाडी या तीनही नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजप सत्ता खेचून आणेल, यासाठी बुथ रचना मजबूत करून भाजपाशिवाय दुसरा कुठलाच पक्ष विजयी होणार नाही, याची व्यूहरचना करण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाgram panchayatग्राम पंचायतSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग