शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे भाजप सर्व निवडणुका लढविणार

By admin | Updated: August 24, 2014 00:50 IST

अतुल काळसेकर यांची माहिती

वेंगुर्ले : येत्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आपला उमेदवार देणार आहे. मात्र, पुढील पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व नगरपरिषदेत भाजप उमेदवार उभा करून भाजप निवडणुका लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी जाहीर केले. वेंगुर्ले तालुका भारतीय जनता पार्टीची मासिक सभा पिराचा दर्गा येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी काळसेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, येत्या पंधरा दिवसात प्रत्येक बुथ गटाचे ५० सदस्य निवडून अधिकृत मान्यता मिळवून जिल्हा परिषद गटाचे मेळावे घ्यावेत. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन भाजपने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवावे व संघटना मजबूत करावी, असे सांगितले. यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले भाजप वेंगुर्ले शहराध्यक्ष संजय तानावडे, शिरोडा शहराध्यक्ष मनोज उगवेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, मिलिंद केळूसकर, तालुकाध्यक्ष साईप्रसाद नाईक, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश रेगे, वसंत पालयेकर, हरेष नाईक, हरिश्चंद्र परब, लक्ष्मीकांत कर्पे, दीपक माडकर, संदीप नवार, शेखर कोयंडे, हरेश देवज, उपेंद्र वालावलकर, प्रकाश करंगुटकर, अनंत नेरूरकर, बाबा राऊत, केशव ठाकूर, दादा वाटवे, प्रशांत खानोलकर, दिनेश आचार्य, विरेंद्र सावंत आदी उपस्थित होते. आभार साईप्रसाद नाईक यांनी मानले. (प्रतिनिधी)