शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Chipi Airport Inauguration: आदित्य ठाकरे टॅक्स फ्री, काम करून दाखवा आनंद वाटेल; नारायण राणे यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 15:47 IST

Chipi Airport Inauguration: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी कोकणवासीयांना शुभेच्छा देत माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण असल्याचेही सांगितले.

सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी कोकणवासीयांना शुभेच्छा दिल्या. माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले. मात्र, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावत आदित्य ठाकरे टॅक्स फ्री, काम करून दाखवा आनंद वाटेल, असा चिमटाही यावेळी काढला. (BJP Narayan Rane in Chipi Airport Inauguration Programme)

जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे. चिपी विमानतळावरून विमानाने केलेले उड्डाण पाहून आनंद झाला. कोकणात अधिकाधिक पर्यटक यावेत. त्या माध्यमातून कोकणात समृद्धी यावी, असा मानस आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे या जिल्ह्याचा विकास करू शकलो. यासाठी टाटा इन्स्टिट्यूटकडे गेलो. त्यावेळी त्यांनी पर्यटन जिल्हा करण्याचा सल्ला दिला. आत्ताचे इन्फ्रास्चक्चर आहे ते नारायण राणेंमुळे त्याच्या जवळपास पण कोणी नाही. शिक्षणात आग्रेसर जिल्हा झाला. तो कोणामुळे ते सर्वांना माहिती आहे, असेही नारायण राणे यांनी यावेळी बोलताना म्हटले. 

आदित्य ठाकरे टॅक्स फ्री, काम करून दाखवा आनंद वाटेल

आदित्य ठाकरे टॅक्स फ्री आहेत. त्यांनी टाटांचा रिपोर्ट वाचावा. त्याचा सखोल अभ्यास करावा. सर्वांना अभिप्रेत असलेले काम करून दाखवावे, तर आम्हाला काय सगळ्यांना आनंद वाटेल, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना खोटे अजिबात आवडायचे नाही. खोटे बोलणाऱ्यांना त्यांच्यासमोर थारा नव्हता, असे सांगत तुम्हाला देण्यात आलेली माहिती खरी नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले. 

विमानातून उतरल्यावर खड्डे बघायचे का 

चिपी विमानतळावर विमानातून उतरल्यावर खड्डे बघायचे का, हा कार्यक्रम कोणाचा काय प्रोटोकोल काय, अशी विचारणा करत जे चाललेय ते एमआयडीसी ८० टक्के माझा अंतर्गत आहेत. समुद्र किनारी कोणते उद्योग येतात ते आणणार, असे आश्वासन देत चिपी विमानतळाचे सुशोभिकरण करणे आवश्यक आहे, त्यासाठी अजित पवारांनी पैसे द्यावेत, अशी मागणीही नारायण राणे यांनी यावेळी बोलताना केली. 

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळNarayan Raneनारायण राणेAaditya Thackerayआदित्य ठाकरे