शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

भाजप लोकदरबार ; विविध समस्यांवर चर्चा

By admin | Updated: November 20, 2014 00:02 IST

तालुक्यातील उद्योग, आरोग्य, रस्ते, वीज, आरोग्य, रेल्वे, एसटी वाहतूक या विविध प्रश्नांवर चर्चा

कुडाळ : तालुका भाजपाचा लोकदरबार नुकताच कुडाळ येथे घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील उद्योग, आरोग्य, रस्ते, वीज, आरोग्य, रेल्वे, एसटी वाहतूक या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. येथील हॉटेल यशधाराच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, राजू राऊळ, काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस चारुदत्त देसाई, नीलेश तेंडुलकर, राजश्री धुमाळे, जयदेव कदम आदी उपस्थित होते. लोकदरबारचे प्रास्ताविक चारूदत्त देसाई यांनी केले. सुरुवातीला मुखेड (जि. नांदेड) येथील आमदार गोविंद राठोड यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व अन्य आमदार व लोकप्रतिनिधींच्या अभिनंदनाचा ठराव राज्य परिषद सदस्य नीलेश तेंडुलकर यांनी मांडला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. माजी आमदार प्रमोद यांनी लोकदरबाराची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली व त्याप्रमाणे कुडाळ तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य, रेल्वे, एसटी वाहतूक या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सुधा शारबिदे्र यांनी कुडाळ शहरातील सुलभ शौचालय कोठे गायब झाली याची चौकशी करावी, अशी मागणी केली. तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत यांनी उद्योग, आरोग्य, सिंचन, रेल्वे, शहरातील समस्या, जमीन महसूल कायदा, नेरूर तलाव सुशोभिकरण, नेरूर येथे बीएसएनएल टॉवर आदी समस्यांबाबत ऊहापोह केला. या लोकदरबारात निरूखे, तेंडोली, गोवेरी, नेरूर, आंदुर्ले, माणगाव, कसाल, भोईचे केरवडे, पिंगुळी ग्रामपंचायत येथील समस्यांची निवेदने स्वीकारण्यात आली. आंदुर्ले येथील दिलीप सर्वेकर या अपंगाला गेली तीन वर्षे शासकीय कारभारामुळे झालेल्या त्रासाबाबतच्या निवेदनावर चर्चा करण्यात आली व त्यांना योग्य न्याय देण्यात येईल, असे अतुल काळसेकर यांनी सांगितले. या लोकदरबाराला स्वाती तेंडोलकर, दक्षता मेस्त्री, गजानन वेंगुर्लेकर, विजय कांबळी, गुरू पाटील, प्रमोद राऊळ, जगदीश उगवेकर, सुहास पारकर, आनंद रेडकर, लक्ष्मी आरोंदेकर, सुंदर मेस्त्री, का. स. नाईक, प्रताप राऊळ, मोहन जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)कुडाळ भाजपाच्यावतीने आयोजित लोकदरबार कार्यक्रमात प्रमोद जठार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतुल काळसेकर, राजन तेली, बब्रुवान भगत, राजू राऊळ, काका कुडाळकर आदी उपस्थित होते.