कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 10:55 AM2022-01-07T10:55:52+5:302022-01-07T10:56:32+5:30

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले ...

BJP candidate Sudhir Chavan dies in Kudal Nagar Panchayat elections | कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

Next

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. गुरुवारी रात्री १२.३० वाजता ही घटना घडली आहे. सुधीर चव्हाण हे भाजपच्या तिकिटावर कुडाळ नगरपंचायतची प्रभाग १६ मधून निवडणूक  लढवत होते.

गुरुवारी रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळ मधील भाजपच्या कार्यालयात आले. यानंतर ते एके ठिकाणी जायला निघाले. तेथे पोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले.

त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, छोटा मुलगा आणि आई असा परिवार आहे. ते कुडाळ मधील डॉक्टर बाणवलीकर यांना कृत्रिम दात पुरवठा करण्याचा व्यवसाय करीत होते.

ते क्रिकेट अप्रतिम खेळायचे. सुधीर हे मूळचे मालवणचे होते. पण गेली कित्येक वर्षे ते कुडाळात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते. त्यामुळे कुडाळात त्यांचा मोठा मित्र परिवार होता. कुडाळातील लोकांशी आणि मित्रपरिवारांशी त्यांची नाळ जुळलेली होती.

त्यांचा मृतदेह कुडाळ रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. सकाळीच शवविच्छेदन करून नंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सुधीर चव्हाण यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील लोकांवर मोठे संकट उभे राहिले आहे. तर त्यांच्या मित्र परिवाराला देखील मोठा धक्का बसला आहे.

Web Title: BJP candidate Sudhir Chavan dies in Kudal Nagar Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.