Sindhudurg: इन्सुलीत गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:07 IST2025-11-04T16:03:31+5:302025-11-04T16:07:56+5:30
घाटात अचानक गव्यांचा कळप दुचाकीसमोर आला

संग्रहित छाया
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीत दुचाकीला गव्याने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मनोज धोंडू सावंत (२९, रा. इन्सुली-डोबाशेळ) हा जखमी झाला. घाट रस्त्यावर दहा ते बारा गवे अचानक समोर आल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली डोबाशेळ येथील मनोज सावंत हा युवक आपल्या ताब्यातील दुचाकीने सावंतवाडी येथून घरी येत होता. दरम्यान, घाटात अचानक गव्यांचा कळप दुचाकीसमोर आला. यात एका गव्याला दुचाकीची धडक बसून अपघात झाला. यावेळी स्वागत नाटेकर, नितीन राऊळ, अनिरुद्ध पालव, रामचंद्र पालव, पिंट्या नाईक, आशीर्वाद पालव, संकेत राऊळ, महेंद्र पांडे यांनी जखमीला मदत केली.