विजापूरी कामगारांना केले कुटुंबांसह एसटीने रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:19 IST2020-05-13T17:10:27+5:302020-05-13T17:19:04+5:30
देवगड : मंगळवारी ८४ विजापूरी कामगारांना कुटुंबांसह चार एसटी गाड्यांतून देवगडहून रवाना करण्यात आले. देवगड तालुक्यातून परप्रांतीय मजुरांना घेऊन ...

विजापूरी कामगारांना केले कुटुंबांसह एसटीने रवाना
देवगड : मंगळवारी ८४ विजापूरी कामगारांना कुटुंबांसह चार एसटी गाड्यांतून देवगडहून रवाना करण्यात आले. देवगड तालुक्यातून परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाºया चार गाड्या देवगड आगारातून सोडण्यात आल्या. या गाड्यांना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी हिरवा झेंडा दाखविला.
देवगड तालुक्यातील गोवळमधील चिरेखाण व्यवसायात काम करणाºया ८४ कामगारांना मंगळवारी चार गाड्यांनी रवाना करण्यात आले. या चारही गाड्या देवगड-कोल्हापूरमार्गे सांगली, जत बुलखेड सीमेपर्यंत जाणार आहेत. त्या ठिकाणी विजापूरी मजुरांना सोडून पुन्हा देवगडकडे येणार आहेत. गाड्या देवगडमध्ये आल्यानंतर पूर्ण सॅनिटायझर करण्यात येणार असून गाड्या घेऊन जाणाºया चालकांना १४ दिवस गृह विलगीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांनी दिली.
यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार मारूती कांबळे, नगराध्यक्षा प्रणाली माने, नायब तहसीलदार प्रिया परब, आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण, स्थानकप्रमुख गोरे, देवरूखकर आदी उपस्थित होते.
विजापूरी कामगारांना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी हिरवा झेंडा दाखवित देवगड आगारातून एसटीने रवाना केले. यावेळी तहसीलदार मारुती कांबळे, नगराध्यक्षा प्रणाली माने, आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण उपस्थित होते.