शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
4
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
5
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
6
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
7
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
8
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
9
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
10
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
11
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
12
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
13
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
14
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
15
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
16
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
17
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
18
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
19
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
20
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

भिरवंडेत ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 5:30 PM

Farmer Sindhudurg- जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.

ठळक मुद्देभिरवंडेत ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम सुरू पडीक जमीन लागवडीखाली आणूया : सतीश सावंत

कणकवली : जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.भिरवंडे गावामध्ये सध्या ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम राबविला जात असून, त्याचा शुभारंभ जांभूळभाटलेवाडी येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष मोहन सावंत, सरचिटणीस सागर सावंत, कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नागेश सावंत, उपसरपंच नितीन सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन मंगेश सावंत, राजेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्या रश्मी सावंत, ग्रामसेवक राकेश गोवळकर, भाई सावंत, सुभाष सावंत, नंदकुमार सावंत, सुरेशचंद्र सावंत, सत्यवान सावंत, आबा सावंत, स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ उपस्थित होते.जांभूळभाटले सेवामंडळाच्यावतीने सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत व सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, ग्रामसेवक राकेश गोवळकर यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना ग्रामविकासासाठी जांभूळभाटले सेवामंडळाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, असे सागर सावंत यांनी सांगितले.

जांभूळभाटलेवाडीतील रखडलेल्या विकासकामांविषयी नागरिकांनी चर्चेतून सहभाग घेतला. ग्रामस्थांनी सुचवलेली कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत आवश्यक तो पाठपुरावा निश्‍चितपणे करेल, असे भिरवंडे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. आभार ग्रामसेवक राकेश गोवळकर यांनी मानले.ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शासनाच्या योजना सक्षमपणे राबवाव्यातगावचा विकास साधताना लोकसहभाग महत्त्वाचा असतो. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत शासनाच्या योजना अधिक सक्षमपणे राबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः पडीक जमिनीच्या विकासासाठी फळबाग लागवडीबरोबरच बांबू लागवडीकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेत पडीक जमिनीमध्ये अधिक बांबू लागवड कशी होईल याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग