कणकवली: बँक ऑफ इंडियाच्या थकीत कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या पथकावर कळसुली येथे एका कर्जदाराने लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बँकेच्या शासकीय वाहनाच्या करचा फुटून मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. संबंधित पथकाने कणकवलीपोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सुजित सुधाकर तरावडे (रा कळसुली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर येथील 'अॅसेट रिकव्हरी' शाखेचे व्यवस्थापक रवी जगजीवन श्रीखंडे हे आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी कर्ज वसुलीच्या कामासाठी आले होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हे पथक कळसुली येथील कर्जदार सुजित सुधाकर तावडे याच्या घराजवळ पोहोचले. बँकेच्या शिपायाने त्याला घराबाहेर बोलावले असता, तावडे हा हातात लोखंडी रॉड घेऊनच बाहेर आला. तुम्ही कोण? कुठून आलात? अशी विचारणा त्याने केली.बँक अधिकाऱ्यांनी आपली ओळख सांगून वसुलीचे आदेश दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या तावडे याने काहीही ऐकून न घेता हातातील लोखंडी रॉड घेऊन बँक कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सर्व कर्मचारी आपल्या शासकीय वाहनात जावून बसले. तरीही संशयित आरोपी तावडे थांबला नाही.त्याने लोखंडी रॉडने गाडीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर जोरदार प्रहार केला. शिवीगाळ करत 'पुन्हा माझ्या घरी आलात तर जिवे मारुन टाकीन अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत बँक व्यवस्थापक श्रीखंडे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मारहाण करण्याचा प्रयत्न आणि मालमतेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : In Sindhudurg, a loan recovery team was attacked with an iron rod. The assailant, Sujit Tarawade, damaged the bank's vehicle and threatened the staff. A police complaint has been filed against him.
Web Summary : सिंधुदुर्ग में कर्ज वसूली दल पर लोहे की रॉड से हमला हुआ। हमलावर सुजीत तरावडे ने बैंक के वाहन को नुकसान पहुंचाया और कर्मचारियों को धमकी दी। पुलिस में शिकायत दर्ज।