शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी, पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:48 IST

मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील जनहित याचिका आदेशाने ही बंदी घालण्यात आली आहे

सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील एकूण १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातलेली आहे, अशी माहिती सावंतवाडी, दोडामार्ग टास्क फोर्स समितीचे सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील जनहित याचिका आदेशाने ही बंदी घालण्यात आली आहे.पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडील दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारत सरकार यांच्याकडील प्रस्तावीत अधिसूचनेमध्ये दोन्ही तालुक्यांतील एकूण २५ गावांचा इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये समावेश आहे. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील जनहित याचिका क्र. १९८/२०१४ मध्ये दि. ५ डिसेंबर २०१८ व दि. २२ मार्च २०२४ चे आदेशान्वये अवैधरीत्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्याकामी व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग टास्क फोर्स समिती तयार करण्यात आलेली आहे.या समितीमध्ये महसूल विभाग, वनविभाग व पोलिस विभागामधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी असून, सदस्य सचिव सहायक वनसंरक्षक हे आहेत. त्याचबरोबर या समितीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार सावंतवाडी, दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग व पोलिस निरीक्षक सावंतवाडी, दोडामार्ग हे सदस्य आहेत.या समितीच्या मासिक बैठकीमध्ये उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधित क्षेत्रामध्ये संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी केलेली कार्यवाही, प्रचार-प्रसिद्धी व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो.सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीने ठरविल्याप्रमाणे, दोडामार्ग तालुक्यात कोठेही गावात खासगी मालकी शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होताना निदर्शनास आल्यास घटनेबाबत जनतेने गावातील पोलिस पाटील, वनरक्षक, तलाठी यापैकी कोणालाही तातडीने कळविण्यात यावे. जेणेकरून वनविभागाकडील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी जाऊन तत्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करतील, तसेच अशा चौकशी प्रकरणांमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशी विनंती करण्यात येत आहे.प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड प्रकरणी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ व महाराष्ट्र जमीन महसूल (झाडे इत्यादींच्या बाबतीतील अधिकारांचे नियमन करण्याबाबत) नियम १९६७ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल.वृक्षतोडीबाबत ऑनलाइन तक्रारीसाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीचा ई-मेल आयडी तयार करण्यात आलेला आहे, ई-मेल आयडी sdtfsawantwadi@ gmail.com असा आहे, या ई-मेलवर आपण वृक्षतोडीच्या घटनांबाबत तक्रार दाखल करू शकता. तसेच वृक्षतोडीच्या तक्रारीसाठी आपण वनविभाग सावंतवाडी ०२३६३-२७२००५ यांच्याकडे दूरध्वनीद्वारेही तक्रार दाखल करू शकता.सावंतवाडी तालुक्यातील गावेअसनिये, पडवे माजगाव, भालावल, तांबोळी, सरमळे (नेवली सह), दाभिळ, ओटवणे, कोनास, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे.

दोडामार्ग तालुक्यातील गावेकुंब्रल, पणतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, उघाडे, कळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी.

English
हिंदी सारांश
Web Title : Tree Felling Banned in Sindhudurg Villages; Task Force for Balance

Web Summary : Tree felling is banned in 13 villages in Sindhudurg district to protect the environment. A task force has been formed to prevent illegal logging and environmental degradation. Citizens are urged to report any tree felling incidents to local authorities.