शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न; जयपुरातील शिवराज गँगमधील तिघांना शिरोड्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:32 IST

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

ओरोस : खंडणीसाठी पिस्तूलने गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. असाच एक गुन्हा जयपूर (राजस्थान) येथे करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथे लपून बसलेले शिवराज गँगचे आरोपी करण पारिक, दीपक जाट ऊर्फ लांबा, नरेंद्रसिंह चौहान या तिघांना सिंधुदुर्गपोलिसांनी ताब्यात घेतले आहे.२४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:३० ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुदतीत (रमणपुरी, जि. जयपूर, राजस्थान) येथे शिवराज गॅंग, राजस्थानचा आरोपी हन्नी बिहारी आणि त्याच्या तीन साथीदारांनी खंडणीसाठी कारमधून येत तक्रारदार व साक्षीदार यांचा पिस्तूलने गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न करून पळून गेले. त्यापैकी आरोपी करण मातादिन पारीक (२२, रा. मोरीजा, ता. चौमू), दीपक सोमवीर जाट ऊर्फ लांबा (२०, रा. सरदारपुरा, ता. अमेर),नरेंद्रसिंग गजेंद्र चौहान (१९, रा. बेनार रोड, खोराबीसल, सर्व जयपूर, राजस्थान) हे गुन्हा केल्यानंतर अस्तित्व लपवण्यासाठी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून शिरोडा येथे वास्तव्यास आले होते. या आरोपींविरुद्ध करधनी पोलिस ठाणे, जयपूर (पश्चिम), राजस्थान येथे भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०९ (१), १८९ (४), ३०८ (२), भारतीय हत्यार अधिनियम १९५९ (संशोधन २०१९) चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

राजस्थानी बेकरीजवळ वास्तव्यसिंधुदुर्ग पोलिसांना हे आरोपी शिरोडा (सिंधुदुर्ग) व गोवा राज्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला ही माहिती देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्याचदरम्यान हे आरोपी शिरोडा एस. टी. बस स्टॅंडजवळील एका राजस्थानी बेकरी व्यावसायिकाच्या बेकरीजवळ राहात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून तिन्ही आरोपींना शिरोडा येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपी राजस्थान पोलिसांच्या ताब्यातआरोपी करन मातादिन पारीक याच्याविरुद्ध जयपूर जिल्ह्यात दोन गंभीर गुन्हे दाखल असून, त्यामध्ये लहान मुलीवर अत्याचार, अमली पदार्थ विक्री अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. हा आरोपी यापूर्वी दोनवेळा सुमारे तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी कारागृहात राहिलेला आहे. नागरिकांना धमकावून किंवा त्यांच्यावर हल्ला करून खंडणी गोळा करण्याच्या उद्देशाकरिता या टोळीकडून गुन्हे केले जात आहेत. या आरोपींना गुरुवारी करधनी पोलिस ठाणे, राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.वैयक्तिक कागदपत्रांची पडताळणी करावीसिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, परप्रांतीय व्यक्ती तसेच अनोळखी भाडेकरू यांना वास्तव्यासाठी ठेवताना किंवा रूम भाड्याने देताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांची पडताळणी करून तशी नोंदणी करून घ्यावी.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस