शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल; सिंधुदुर्गातील सावडावमध्ये उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:15 IST

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतीत इयत्ता तिसरी ते सहावी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या ६ मुलांचे ...

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतीत इयत्ता तिसरी ते सहावी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या ६ मुलांचे दोन अनोळखी व्यक्तींकडून चारचाकी गाडीतून अपहरण करण्याची घटना घडली आहे. मात्र, त्या मुलांनी प्रसंगावधान दाखवत त्या दोन अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. त्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. ही घटना काल, सोमवारी (दि.१३) घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन अज्ञात अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा चौफेर तपास करण्यात येत आहे. सावडाव येथील पाचवी व सहावीत शिकत असणाऱ्या ५ मुली व तिसरीत शिकणारा १ मुलगा एका वाडीतील एका घरातील कुमारिका ओवाळणीचा कार्यक्रम आटपून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास डगरेवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये जात होते. दरम्यान, एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी मधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.मात्र, मुलांनी चालक व त्याचा अन्य एक  सोबती हे फोनवर  बोलत असल्याची संधी साधली. तसेच त्या वेळात गाडीतून मुलांनी पळ काढला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.कुमारिका ओवाळणीच्या कार्यक्रमासाठी काही शाळकरी मुले सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गेली  होती.त्यापैकी काही मुले आपल्या घरी निघून गेली.त्यानंतर ५ मुली आणि एक मुलगा जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत नेहमीप्रमाणे  निघाली होती. साधारणतः ५०० मीटर अंतरावर ती चालत पोहचली असतानाच एक पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी तिथे आली. त्यातून दोघेजण खाली उतरले. तसेच त्या शाळकरी मुलांना चाकूचा धाक दाखवत त्यांनी गाडीत कोंबले. त्या ठिकाणी चारचाकीमधील एका व्यक्तीने विद्यार्थांच्या चेहऱ्यावर लाल कुंकू लावले.आणि सुसाट वेगाने जँगलमय भागात काही अंतरावर गेल्यावर पाच मुलांची दप्तरे तेथील ओहोळात टाकली. एक दप्तर मुलांजवळच राहिले.प्राथमिक शाळा नं. १ पार करून चारचाकी पुढे गेली. ही चारचाकी धनगरवाडीकडे जात होती.तेवढ्यात त्या अपहरण करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्यामुले तो चारचाकी मधून खाली उतरून बोलायला लागला. त्या पाठोपाठ दुसरी व्यक्ती देखील खाली उतरली. ती संधी साधत त्या शाळकरी मुलांनी चारचाकीचा दरवाजा उघडुन खाली उतरत रस्त्याच्या उलट्या दिशेने धावत पळ काढला. यावेळी तेथीलच एका शाळेतील  शिक्षक अशोक साळुंखे- देशमुख व इतरांना मुले पळताना दिसली. त्यांनी त्या मुलांना गाठले. तसेच पळण्याचे कारण विचारले.त्यानंतर सर्व मुलांनी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न कसा झाला? याबाबत त्यांना माहिती कथन केली.एका मुलीच्या डोक्यावर नखाणी ओरबाडल्याच्या खुणाही दिसून येत होत्या. त्यामुळे ताबडतोब सर्व पालकांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना फोनवर संबधित घटनेची माहिती शिक्षकांनी कळवली.काही वेळातच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले. यावेळी सरपंच आर्या वारंग, उपसरपंच दत्तात्रय काटे, संजय झगडे, चंद्रकांत तेली, परशुराम झगडे, पोलीस पाटील अंकुश वारंग, पालक  संतोष गावकर,कुमार कामतेकर, संतोष जठार, राजेंद्र वारंग, प्रदीप गावकर, संतोष मोरे, चंद्रकांत मेस्त्री, महेश पुजारे, संतोष तेली, तुकाराम तेली, मंगेश मेस्त्री, विद्याधर वारंग, साईनाथ डगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.कणकवली पोलिसांनाही घटनेबाबत  कळवण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी कणकवली पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अनिल जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक रामचंद्र शेळके, कणकवली  सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगाडे, हवालदार मिलिंद देसाई आदींचे पथक दाखल झाले. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, अज्ञात अपहरणकर्त्यांचा सुगावा लागू शकला नाही.त्या अज्ञात आरोपींविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यापूर्वी या घटनेसारख्या अन्य साम्य असलेल्या घटना पाहून तपासाचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरण