शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न : म्हापसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:14 PM

women and child development Zp Sindhudurg-जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १०० महिलांसाठी तलंग योजना आणली आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करताना जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमात दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न : म्हापसेकर तोंडवळी येथे जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिर

ओरोस : जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १०० महिलांसाठी तलंग योजना आणली आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करताना जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमात दिली.जिल्हा परिषद शेष फंडातून जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. हे प्रशिक्षण शुक्रवारी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील साईसागर रिसॉर्टमध्ये झाले. याचे उद्घाटन अध्यक्ष म्हापसेकर यांच्याहस्ते करण्यात आले.

आयुष्यात प्रशिक्षण महत्त्वाचे असते. प्रशिक्षणातून ज्ञान मिळते, समाजाच्या विकासाची माहिती मिळते. त्यातून विकास करणे सोपे जाते, असे सांगतानाच, जिल्ह्यात बांबू लागवडीला मोठी संधी आहे. कोकणात याचा फायदा करून घेतला पाहिजे, असेही म्हापसेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, वित्त व लेखा अधिकारी मदन भिसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी, मालवण गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, सरपंच आबा कांदळकर आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांनी, ग्रामीण विकास, बांबू लागवड व जलजीवन मिशन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा सावंत, संजना सावंत, उन्नती धुरी, श्वेता कोरगावकर, मनस्वी घारे, सावी लोके, शर्वाणी गावकर, श्रिया सावंत, समिधा नाईक, मानसी जाधव, संजय देसाई, अनघा राणे, जेरॉन फर्नांडिस, रवींद्र जठार, विष्णुदास कुबल, गणेश राणे, मालवण पंचायत समिती सदस्या मनीषा वराडकर, गायत्री ठाकुर, विनोद आळवे, अशोक बागवे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ५० जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे किमान ४० सदस्य प्रशिक्षणाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. शिवसेनेचा एकही सदस्य आलेला नाही. ते ठरवून आले नाहीत का ? ते समजू शकलेले नाही, असेही राजेंद्र म्हापसेकर यांनी यावेळी सांगितले. पाटील, देवधरांचे मार्गदर्शनयावेळी जिल्ह्यातील स्वयंरोजगाराच्या नवीन वाटा या विषयावर प्रशिक्षण देताना मिलिंद पाटील यांनी, बांबू लागवडीला १९९५ पासून प्राधान्य सुरू झाले आहे. या लागवडीत कमी मेहनतीत जास्त आर्थिक लाभ मिळतो. जिल्ह्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागात बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे, असे सांगत माहिती दिली. भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी, राजकीय लोकांनी काम करताना सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रित करून विकास साधण्यासाठी धोरण बदलले पाहिजे, असे आवाहन केले. 

 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासzpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग