Sindhudurg: रेवंडीतील वाळू कामगारांवर हल्ला, एकाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 21, 2025 15:28 IST2025-01-21T15:28:03+5:302025-01-21T15:28:44+5:30

एक हल्लेखोर ताब्यात 

Attack on sand workers in Revandi Sindhudurg one dead | Sindhudurg: रेवंडीतील वाळू कामगारांवर हल्ला, एकाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल 

Sindhudurg: रेवंडीतील वाळू कामगारांवर हल्ला, एकाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल 

मालवण: रेवंडी खाडी किनारी उभे असलेल्या वाळू काढणाऱ्या बोटीवर काम करणाऱ्या पाच कामगारांवर झालेल्या हल्ल्यात खाडीपात्रात पडलेल्या एका कामगाराचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी तळाशील येथील पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. यातील एकाला आज, मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले.

रेवंडी खाडी किनारी उभे असलेल्या वाळू काढणाऱ्या बोटीवर काम करणाऱ्या पाच कामगारांवर छोट्या बोटीच्या सहाय्याने येऊन हल्लेखोरांनी हल्ला करून त्यांना मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या हल्ल्यात एक कामगार जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडला होता. त्या कामगाराचा गेले दोन दिवस शोध घेण्यात येत होता. 

आज, मंगळवारी सकाळी शेल्टी खाडी किनारी त्याचा मृतदेह सापडून आला. पोलिसांनी याप्रकरणी तळाशील येथील पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून यातील दोघांची नावे निश्चित झाली असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे. यातील एकाला आज पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Attack on sand workers in Revandi Sindhudurg one dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.