कुडाळ येथील उद्योजक चंदू पटेल याच्यावर प्राणघातक हल्ला; कारण अस्पष्ट, हल्लेखोर ताब्यात
By अनंत खं.जाधव | Updated: November 4, 2022 03:08 IST2022-11-04T03:06:10+5:302022-11-04T03:08:08+5:30
दरम्यान हा हल्ला पोलीस ठाण्या पासून हाकेच्या अंतरावर घडल्याने व्यवसायिकांत एकच खळबळ उडाली असून हल्ला नेमका कशासाठी झाला हे कारण कळू शकले नाही.

कुडाळ येथील उद्योजक चंदू पटेल याच्यावर प्राणघातक हल्ला; कारण अस्पष्ट, हल्लेखोर ताब्यात
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कुडाळ येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर दोघांनी प्राण घातक हल्ला केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार गुरूवारी रात्री उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यासमोर घडला.
दरम्यान, हल्ला करणारे संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. जखमी पटेल यांना कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, भाजपच्या संध्या तेरसे,आनंद बांदिवडेकर,लालू पटेल यांनी धावाधाव केली.
दरम्यान हा हल्ला पोलीस ठाण्या पासून हाकेच्या अंतरावर घडल्याने व्यवसायिकांत एकच खळबळ उडाली असून हल्ला नेमका कशासाठी झाला हे कारण कळू शकले नाही. दरम्यान पोलीसांकडून हल्या मागच्या कारणाचा कसून शोध घेण्याचे काम सुरू असून कुडाळ पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पथक कुडाळ येथे दाखल झाले आहे.