शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

३७ कोटी ५0 लाखांच्या अंदाजपत्रकास मंजुरी

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

वित्त समिती सभेत माहिती : १८ मार्चच्या सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी ठेवणार

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या पार पडलेल्या वित्त समिती सभेत सन २०१५-१६ साठी २३ कोटींचे अंतिम सुधारीत अंदाजपत्रक व सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १४ कोटी ५० लाखांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या दोन्ही अंदाजपत्रकांना या सभेत मंजुरी देऊन अंतिम मंजुरीसाठी १८ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या खास सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची विशेष सभा सभापती दिलीप रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, सुभाष नार्वेकर, सोनाली घाडीगांवकर, रिटा अल्फान्सो, सुगंधा दळवी, समिती सचिव तथा लेखा व वित्त अधिकारी मारुती कांबळे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.२०१५-१६ च्या सुधारीत अंदाजपत्रकात ५ कोटी ९० लाख ५७ हजार ३०० रुपये आरंभीची शिल्लक होती. ती शिल्लक अंतिम सुधारीत अंदाजपत्रक तशीच शिल्लक राहिली आहे. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ती ५० हजार रुपये दाखविण्यात आली आहे. सन २०१५-१६ चे सुधारीत अंदाजपत्रक १९ कोटी ७० लाख ३५ हजार रुपयांचे होते. यात ३ कोटी २९ लाख ६५ हजाराने वाढ करून २३ कोटींचे झाले.जिल्हा परिषद इमारत देखभाल दुरुस्तीसाठी ६३ लाख तर जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी निवास दुरुस्तीसाठी ३५ लाख रुपये एवढा निधी जर दरवर्षी दिला जात असेल तर आमच्या मतदारसंघाचा विकास कसा होणार असा सवाल यावेळी सदस्य सुरेश ढवळ यांनी उपस्थित केला व सभागृहात नाराजी व्यक्त केली.सन २०१६-१७ या आगामी सुधारीत अर्थसंकल्पाचे सभागृहात वाचन करण्यात आले. यात समिती सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने यातील कित्येक योजनांचा निधी अन्य योजनांवर वळता करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद भवनातील सभागृहांच्या अंतर्गत सुविधा पुरविण्यासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली होती. यावर आक्षेप घेतला. हा सर्व निधी ग्रामीण भागातील रस्ते व पायवाटांवर वळविण्यात आला. जिल्हा परिषद इमारत देखभाल दुरुस्तीसाठी ६३ लाख तर जिल्हा परिषद पदाधिकारी अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी ३५ लाख एवढ्या निधीला सदस्य सुरेश ढवळ यांनी आक्षेप नोंदविला. (प्रतिनिधी) एकाच योजनेला दोनदा निधीसुधारीत अर्थसंकल्प सादर करताना विंधन विहीर दुरुस्तीसाठी १० लाख तर बोअरवेल्ससाठी १८ लाखांची तरतूद केली आहे. मात्र, बोअरवेल व विंधन विहिर हा एकच प्रकार असल्याचे सदस्यांच्या लक्षात येताच संबंधित लघुपाटबंधारेच्या यांत्रिकीकरणाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले. तर त्या अधिकाऱ्याने आपल्या बचावाखातर हा बऱ्याच वर्षांपूर्वी निर्माण केलेला हेड असल्याचे सांगितले.बेघरांना निधीची तरतूद करासिंधुदुर्गात शेकडो बेघरांची संख्या आहे. मात्र त्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही. त्यामुळे अशा बेघर लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र हेड निर्माण करा असे आदेश यावेळी देण्यात आले.