शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

उष्माघातापासून सावधान, काळजी घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:09 IST

गेल्या काही दिवसांत उष्णतेचे प्रमाण वाढले आहेत. आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांना उन्हात गेल्यामुळे अचानक उष्माघात जाणवतो. त्यांनी सावधानता बाळगावी. तसेच नाकातून रक्त येणाऱ्यांनी नाकावर बर्फ ठेवावा, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत आहे. सावंतवाडीत असे प्रकार घडले असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देउष्माघातापासून सावधानकाळजी घेण्याचे आवाहन नाकातून रक्त येण्याचे प्रकार वाढले

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांत उष्णतेचे प्रमाण वाढले आहेत. आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांना उन्हात गेल्यामुळे अचानक उष्माघात जाणवतो. त्यांनी सावधानता बाळगावी. तसेच नाकातून रक्त येणाऱ्यांनी नाकावर बर्फ ठेवावा, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत आहे. सावंतवाडीत असे प्रकार घडले असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.आपल्या शरीराचे तापमान नेहमी ३७ अंश सेल्सिअस असते. या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. पण घामाच्या रुपाने पाणी बाहेर जाते व शरीर ३७ अंश सेल्सिअस तापमान कायम राखते. सतत घाम आल्यास पाणी पिणे अत्यंत गरजेचे आणि अत्यावश्यक आहे.पाणी शरीरात इतरही अनेक महत्त्वाची कामे करते. त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रुपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंशाच्या पुढे जाते आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंशच्या पुढे जाऊ लागते.

शरीराचे तापमान जेव्हा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातले प्रोटिन अक्षरश: शिजू लागते. (उकळत्या पाण्यात अंडे उकडते तसे). स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात, हे उष्माघातात होते.रक्तातले पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते. रक्तदाब अत्यंत कमी होतो. महत्त्वाच्या अवयवांना (विशेषत: मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो. माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढवतो, असे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले. उन्हाळ््यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे-थोडे पाणी पीत रहावे व आपल्या शरीराचे तापमान ३७ अंशच कसे राहील, याकडे लक्ष द्यावे व उष्माघात टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्माघाताचा परिणाम वयस्कर व्यक्ती, खेळाडू, लहान मुले, फिरतीवरील कामगार यांना होऊ शकतो. उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, थंड पाण्याने आंघोळ करावी, बंद कारमध्ये बसू नये, असे डॉ. राजेश नवांगुळ यांनी म्हटले आहे.

उष्माघात टाळण्यासाठी डॉक्टरांच्या टीप्सघाम न येणे, त्वचा कोरडी, गरम व लाल होणे, चक्कर येणे आणि डोकेदुखी, उलट्या व बेशुद्धपणा अशी उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. राजेश नवांगुळ यांनी केले आहे.उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत करा. काम करताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबून पाणी प्या. शक्यतो सुती (कॉटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा. डोक्यावर रुमाल, टोपी इत्यादींचा वापर करा.आहारात ताक-दही इत्यादींचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळावा. कोल्ड्रिंक ऐवजी लिंबू सरबत, नारळपाणी याचा वापर करा. दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळावा.लहान मुले, गरोदर माता, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडू देऊ नका. अशक्तपणा, थकवा, ताप-उलट्या इत्यादी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातsindhudurgसिंधुदुर्ग