शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Anganwadi Jatra 2020 Date : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा 17 फेब्रुवारीला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 10:10 AM

Anganwadi Jatra 2020 Date : दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या जत्रौत्सवाची तारीख निश्चित झाली आहे.

सिंधुदुर्ग -  दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या जत्रौत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. प्रथेनुसार झालेली पारथ आणि नंतर देवीने दिलेल्या कौलानुसार श्री देवी भराडीचा जत्रौत्सव 17 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद (कौल) लावण्यात आला. देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख  निश्चित झाली आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आंगणेवाडीच्या जत्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात.  देवीला कौलप्रसाद लावून यात्रोत्सव ठरविला जातो. मुंबईकरांची प्रचंड गर्दी असते. महापालिका नगरसेवक, महापौर, सर्व पक्षांची नेतेमंडळी, सिनेस्टार दर्शन घेतात. यात्रोत्सव दीड दिवस चालतो. मंत्रिमहोदयही उपस्थित असतात. आंगणेवाडी गावकर मंडळ गावपारध करून (डुकराची शिकार) त्यानंतर पारंपरिक पद्धतीने तारीख ठरवितात.  दरवर्षी किमान १० लाख भाविक दोन दिवसात दर्शनासाठी येतात. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि स्थानिक मिळून १५०० कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतात. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांच्या यात्रापूर्व नियोजनाच्या किमान ५ ते ६ बैठका होतात.

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीsindhudurgसिंधुदुर्गAdhyatmikआध्यात्मिकMaharashtraमहाराष्ट्र