...अन् अखेर त्या महिलेला आपले कुटुंब मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 01:09 PM2021-02-11T13:09:00+5:302021-02-11T13:10:56+5:30

Women Sindhudurg Police- सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग संस्थेमुळे गोवा राज्यातील बिचोली येथील कुटुंबापासून ताटातूट झालेल्या महिलेची तिच्या कुटुंबाशी भेट झाली आहे. स्पष्ट काही सांगता न येणाऱ्या महिलेला कुडाळ पोलिसांच्या मदतीने कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

... and finally the woman got her family | ...अन् अखेर त्या महिलेला आपले कुटुंब मिळाले

गोवा-बिचोली येथील कुटुंबापासून ताटातूट झालेल्या महिलेला सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग संस्थेच्या सहकार्याने व पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. ( छाया - मनोज वारंग )

Next
ठळक मुद्दे...अन् अखेर त्या महिलेला आपले कुटुंब मिळाले सखी वन स्टॉप सेंटरची मदत : बेपत्ता महिलेची कुटुंबीयांशी भेट

सिंधुदुर्ग : जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग संस्थेमुळे गोवा राज्यातील बिचोली येथील कुटुंबापासून ताटातूट झालेल्या महिलेची तिच्या कुटुंबाशी भेट झाली आहे. स्पष्ट काही सांगता न येणाऱ्या महिलेला कुडाळ पोलिसांच्या मदतीने कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कुडाळ तालुक्यातील पावशी येथे २६ जानेवारी २०२१ रोजी रात्री १०.३० वाजता, पोलिसांना एक फिरती महिला आढळली होती. तिची चौकशी केल्यावर समजले की त्या महिलेला स्वतःची माहितीही व्यवस्थित सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सखी वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधला. जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत हे सखी वन स्टॉप सेंटर चालविण्यात येते.

पावशी येथे सापडलेल्या या महिलेचे सखी वन स्टॉप सेंटर येथे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी ती महिला असंबंद्ध बोलू लागली होती. यावेळी सखी वन स्टॉप सेंटर येथे समुपदेशन करताना काही माहिती मिळाली. तसेच तिला उपचारांची आवश्यकता असल्याने तिला कुडाळ पोलिसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

तिने दिलेल्या त्रोटक माहितीच्या आधारे ती गोवा राज्यातील बिचोली येथील असल्याचा शोध घेतला. बिचोली, गोवा येथील पोलीस ठाण्यामध्ये या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली होती. या सर्व बाबींची खातरजमा करून व महिलेची ओळख पटवून ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ पोलिसांच्या मदतीने सखी वन स्टॉप सेंटरने या महिलेला नातेवाईकांच्या ताब्यात दिले आणि ताटातूट झालेल्या या नात्यांची पुन्हा भेट घडली.

याप्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, विधी सल्लागार तथा प्रभारी संरक्षण अधिकारी नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात आली. तसेच गृह विभागाच्या पोलीस अधीक्षक संध्या गावडे आणि त्यांचे सहकारी यांचे सहाय्य लाभले.

 

Web Title: ... and finally the woman got her family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.