आनंदवाडी प्रकल्प लवकरच हस्तांतरीत : विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:02 IST2020-06-03T15:42:14+5:302020-06-03T16:02:20+5:30
आनंदवाडी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मच्छिमारांकडे हस्तांतरीत केला जाईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.

आनंदवाडी प्रकल्पाच्या कामाची खासदार विनायक राऊत यांनी पाहणी केली. यावेळी नंदकुमार घाटे, अतुल रावराणे, विलास साळसकर आदी उपस्थित होते.
देवगड : आनंदवाडी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मच्छिमारांकडे हस्तांतरीत केला जाईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.
खासदार विनायक राऊत यांनी आनंदवाडी प्रकल्पकामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी नंदकुमार घाटे, शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, निवृत्ती तारी आदी उपस्थित होते.
सुरुवातीला या प्रकल्पाचे भरावाचे काम करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी जेवढे काम होईल तेवढे करा अशा सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. शेड बांधण्याचे काम सुरू असून कामाची गती चांगली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.