शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वपक्षीयांचे शक्तीप्रदर्शन

By admin | Updated: September 28, 2014 00:22 IST

विधानसभा निवडणूक : शेवटच्या दिवशी प्रशासनावर उमेदवारी अर्जांची बरसात

रत्नागिरी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी प्रशासनावर उमेदवारी अर्जांचा पाऊसच पडला. अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केल्याने पाचही मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शनिवारी एकाच दिवशी विक्रमी ४१ अर्ज दाखल झाले.या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती संपुष्टात आल्याने आणि त्यासाठी कालावधी गेल्याने शेवटच्या दिवशीपर्यंत उमेदवारांना शनिवारपर्यंत वाट पहावी लागली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख चारही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा शेवटच्या दिवशी करण्यात आल्याने शनिवारी एकाच दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांची रिघ लागली होती.जिल्ह्यातील पाच जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांनी १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत. यादी जाहीर करण्यास झालेला विलंब आणि युती-आघाडीतील फाटाफूट यामुळे शनिवारी ४१ अर्ज दाखल झाले. दापोलीतून सर्वाधिक १२, गुहागरातून ४, चिपळुणातून ९, रत्नागिरीतून १० आणि राजापुरातून ६ असे एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. युती आणि आघाडीमधील मुख्य घटक पक्ष वेगवेगळे झाल्याने अनेक इच्छुकांना संधी मिळाली त्यामुळे या निवडणुकीत अनेकांना संधी मिळाली. तसेच काही पक्षांना तर उमेदवार म्हणून कोणाची निवड करावी, असाही प्रश्न पडल्याने अनेक नवखे चेहरे या निवडणुकीत आपलं नशिब अजमावण्यासाठी उभे राहिल्याचे दिसून येत होते.अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असतानाही जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रत्नागिरीत उदय सामंत यांनी, दापोलीत किशोर देसाई, संजय कदम, राजापुरातून अजित यशवंतराव, गुहागरातून शिवसेनेचे विजय भोसले यांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे अनेक ठिकाणी शनिवारी राजकीय वातावरण ढवळून निघाले असून रविवारपासून प्रचाराला सुरूवात होईल.(प्रतिनिधी)