Sindhudurg: पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचेही निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:38 IST2025-02-18T18:38:16+5:302025-02-18T18:38:36+5:30
सावंतवाडी : पतीचे निधन होऊन अवघे सहा दिवस पूर्ण होतात न होतात तोच पत्नीने प्राण सोडल्याची धक्कादायक घटना सावंतवाडी ...

Sindhudurg: पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचेही निधन
सावंतवाडी : पतीचे निधन होऊन अवघे सहा दिवस पूर्ण होतात न होतात तोच पत्नीने प्राण सोडल्याची धक्कादायक घटना सावंतवाडी शहरातील झिरंगवाडी परिसरात घडली. सहा दिवसांपूर्वीच मंगेश बाबू नाईक (वय-५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. तर रविवारी मयूरी मंगेश नाईक (५२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
मंगेश नाईक काही दिवसांपासून आजारी होते. त्यातच त्यांचे ११ फेब्रुवारीला निधन झाले. पतीचा वियोग सहन न झाल्याने मयूरी नाईक यांचे रविवारी निधन झाले. त्यांना श्वसनाचा त्रास असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात मुली, वडील, सासरे, भाऊ, दीर, भावजय, जाऊ, पुतणे असा परिवार आहे. संतोष, सुमन व कृष्णा नाईक यांचे ते भाऊ, भावजय होत.