आदित्य ठाकरे गुरुवारी कोकण दौऱ्यावर, सिंधुदुर्गात खळा बैठकीतून जनतेशी संवाद साधणार

By सुधीर राणे | Updated: November 21, 2023 16:08 IST2023-11-21T16:06:36+5:302023-11-21T16:08:01+5:30

कणकवली : युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे गुरुवारी (दि. २३) रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौ-यावर येणार आहेत. ...

Aditya Thackeray on Konkan tour on Thursday, Khala will interact with the public through a meeting In Sindhudurg | आदित्य ठाकरे गुरुवारी कोकण दौऱ्यावर, सिंधुदुर्गात खळा बैठकीतून जनतेशी संवाद साधणार

आदित्य ठाकरे गुरुवारी कोकण दौऱ्यावर, सिंधुदुर्गात खळा बैठकीतून जनतेशी संवाद साधणार

कणकवली : युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे गुरुवारी (दि. २३) रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौ-यावर येणार आहेत. जिल्ह्यात पक्ष वाढीसंदर्भात ते खळा बैठकांच्या माध्यमातून पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनतेशी ते संवाद साधणार आहेत अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी दिली आहे. 

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे. गुरुवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता खळा बैठक लीना कुबल यांचे घर, दोडामार्ग (दोडामार्ग तालुका), दुपारी १२.२५ वा. चंद्रकांत कासार यांचे घर, सावंतवाडी (सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका), दुपारी १.३० वा. भेट मंदार शिरसाट यांचे घर, कुडाळ येथे. 

दुपारी १.५० वा. स्नेहा दळवी यांचे घर, बांबार्डे (कुडाळ, मालवण तालुका), दुपारी ३.०० वा. व पत्रकार परिषद सतिश सावंत यांचे घर, कणकवली (वैभववाडी, देवगड तालुका), सायंकाळी ४.०० वा. कणकवली येथून राजापूरकडे ते प्रयाण करणार आहेत. 

Web Title: Aditya Thackeray on Konkan tour on Thursday, Khala will interact with the public through a meeting In Sindhudurg