शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटणमध्ये अतिरिक्त वाळूसाठा जप्त

By admin | Updated: September 23, 2014 23:57 IST

प्रशासनाची धाड : वाळू व्यावसायिकांना चपराक

खारेपाटण : खारेपाटण येथे विजयदुर्ग खाडी लागून असल्याने या खाडीला शुकनदीचे पात्र जावून मिळते. परंतु या नदीपात्रातील वाळू राजरोसपणे काढली जात असून काही ठिकाणी अनधिकृत साठा करून ठेवणे तसेच चोरटी वाहतूक करणे या गोष्टी घडत आहेत. परंतु या वाळू माफियांवर नुकतीच प्रशासनाच्यावतीने धाड टाकण्यात आली व अतिरिक्त वाळूसाठा जप्त करून दंड आकारणी करण्यात आली. त्यामुळे या कारवाईमुळे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू व्यावसायिकांना या निमित्ताने मोठी चपराक बसली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटणमध्ये चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचे वृत्त प्रशासनाला मिळताच खारेपाटण तलाठी संतोष सावंत, वारगांव तलाठी सावंत, तळेरे तलाठी दीपक पावसकर यांच्यासह सर्कल गोखले व खारेपाटण पोलीस पाटील चंद्रकांत शेट्ये यांनी सामूहिकपणे शुकनदीवरील जैनपार भागात धाड टाकली. यावेळी वाळू चोरी करणारे कामगार आपली हत्यारे, जाळ्या, पाट्या, घमेले, खोरी तेथेच टाकून पळून गेले. हे साहित्य पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले तर नदीपात्रातून १ ब्रास सुमारे २५०० रुपये किंमतीची वाळू जाग्यावर काढण्यात आली होती ती जप्त करण्यात आली.तसेच खारेपाटण रामेश्वरनगर येथे खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक सहदेव कोंडविलकर यांच्या घराच्या जवळ अनधिकृत वाळू साठा केल्याचे आढळले. सुमारे ३ ब्रास वाळू साठा त्यांच्या घराजवळ सापडल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा तिथे पोहोचली व पंचयादी घालण्यात आली. यावेळी वाळू वाहतूक करणारे नितीन चव्हाण व बाळू उर्फ महादेव भीमराव चव्हाण हे बंधू अनधिकृतपणे आपल्या ट्रॅक्टरने नदीपत्रातील वाळू काढत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ते कारवाईवेळी सापडू शकले नाहीत. परंतु अनधिकृत वाळू साठा केल्याप्रकरणी कोंडविलकर यांना २० हजारांचा दंड आकारण्यात आला. खारेपाटणमध्ये अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई करण्यात आल्यामुळे सरकारी मालमत्तेची राजरोसपणे होणारी लूट यामुळे येणाऱ्या काळात निश्चित थांबू शकेल. (वार्ताहर)