शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
2
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
3
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
4
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
5
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
6
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
7
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
8
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
9
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
10
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
11
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
12
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
13
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
14
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
15
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
16
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
17
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
18
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
19
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
20
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे चक्र वर्षाऋतूशी जोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 23:38 IST

राजेंद्रसिंह : जलपुरूषाचा रत्नागिरीत जलचेतना मार्गदर्शन मेळावा

रत्नागिरी : प्रत्येक ठिकाणी उद्योग उभारण्याची आवश्यकता नाही, शिवाय नद्या जोडून कोणताही विकास साध्य होणार नाही, त्याऐवजी देशातील लोक एकमेकांशी जोडले जाणे आवश्यक आहे. शेती अथवा पिकांचे चक्र वर्षाऋतूच्या चक्राशी जोडण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती रॅमन मॅगसेसे व जलक्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित जलचेतना मार्गदर्शन मेळाव्यापूर्वी डॉ. राजेंद्रसिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.डॉ. राजेंद्रसिंह यांनी पर्यावरण रक्षणासाठी लढा सुरू केला आहे. विशेषत: पाणी वाचविण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे. जलचेतना मेळाव्याच्या निमित्ताने ते रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, भारत सर्वाधिक तरूणवर्गाचा देश आहे. मात्र, ऐन तारूण्यात येथील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. भविष्यातील पिढीसाठी संपत्ती नाही तर जीवन महत्त्वाचे आहे. या नद्या पुनरूज्जीवित न झाल्यास पुढील पिढी आपला अवमान करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असेही सिंह यांनी सांगितले. कोकण हा निसर्गाचा सुपुत्र आहे, त्यामुळेच याठिकाणी भरपूर पर्जन्यवृष्टी होते. भरमसाठ जंगलतोडीमुळे सह्याद्री भकास होत चालला आहे. डोंगरदऱ्यात वसलेल्या कोकणातील पाणी नद्यांद्वारे समुद्राला जावून मिळते. हे पाणी अडवण्याची आवश्यकता आहे. नद्यांमधील गाळ उपसून तेथील प्रदूषण थोपवले पाहिजे. नद्या पुनरूज्जीवित झाल्या की, आपोआप विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात धरणे बांधण्यात आली. शासनाने पाण्यासाठी सर्वाधिक पैसा खर्च केला, तरीही पाण्याविना आत्महत्या करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याची खंत डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. हिरवळ वाढण्यासाठी मातीची आवश्यकता आहे. नद्यांमधील गाळ उपसा केल्यावर पाणी साचेल. पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाण्याचे ढग तयार होतील, शिवाय पर्जन्यवृष्टी चांगली होईल. शिवारे डोलू लागतील, सृष्टीचे नंदनवन होईल. राजस्थानमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे, तर कोकणात का होणार नाही. त्यासाठी समस्त युवावर्गाने जलसाक्षरता चळवळ मोठ्या प्रमाणावर उभारण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध पाण्याच्या थेंबन्थेंबाचा वापर उत्तमरित्या होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पावसाचे प्रमाण अधिक : पाणी अडविण्याची गरजकोकणात मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण आहे. मात्र, तरीही पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. डोंगर माथ्यावर पडणारे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे हे पाणी अडविणे गरजेचे आहे. हे पाणी अडविल्यास पाणीटंचाईची झळ कमी प्रमाणात पोहचू शकते. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.बंधारे मोहीमरत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची पोहोचणारी झळ कमी करण्यासाठी ‘मिशन बंधारे’ ही मोहीम राबविली जात आहे. त्याद्वारे नदी, वहाळ याठिकाणी वनराई, विजय बंधारे बांधण्यात येत आहेत. यामुळे पाणी अडविण्यास मदत होत असून, जिल्ह्यात ही मोहीम सुरू आहे.प्रत्येक ठिकाणी उद्योग उभारण्याची गरज नाही.नद्या जोडून कोणताही विकास साध्य होणार नाही.भारत सर्वाधिक तरूणवर्गाचा देश आहे.कोकणातील पाणी नद्यांद्वारे समुद्राला मिळते.