गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 21:43 IST2025-07-25T21:42:04+5:302025-07-25T21:43:18+5:30
Sindhudurg Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रेयसीच्या मदतीने तिच्याच शिक्षक असलेल्या नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोली कावळेसाद पॉईंट येथील दरीत टाकल्या प्रकरणात कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुरेश आप्पासो चोथे याने तुरुंगातून पलायन केलं आहे.

गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
सावंतवाडी - कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रेयसीच्या मदतीने तिच्याच शिक्षक असलेल्या नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोली कावळेसाद पॉईंट येथील दरीत टाकल्या प्रकरणात कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुरेश आप्पासो चोथे याने कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करत कार वॉशिंग सेंटरवरून ग्राहकाची कार घेऊन पळून गेल्याने गडहिंग्लज येथील शिक्षक हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील शिक्षक विजयकुमार गुरव याच्या पत्नीचे शेजारीच राहात असलेल्या सुरेश चोथे याच्या सोबत प्रेमसंबंध होते.या प्रेम संबधात शिक्षक गुरव हा अडथळा होत असल्याने शिक्षक गुरव याच्या पत्नीने प्रियकर सुरेश चोथे याला सोबत घेत कुटूंबातील सर्व जण गाढ झोपेत असतनाच राहत्या घरातच 6 नोव्हेंबर 2017 रोजी मध्यरात्री च्या सुमारास ठार मारले होते.व मृतदेह आंबोली घाटातील कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत आणून टाकला होता.
मृतदेह मध्यरात्री च्या सुमारास टाकण्यात आल्यानंतर घटनास्थळावर रक्ताचे डाग पडले होते.त्यामुळे काहि तरी अघटित घडल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले यावरून सावंतवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे या माहितीच्या आधारे पोलिसांनी कावळेसाद पॉईंट च्या खोल दरीत बाबल आल्मेडा यांची टिम उतरवून खात्री केली असता एक मृतदेह खोल दरीत असल्याचे दिसून आले त्यानंतर हा मृतदेह वर आणण्यात आला पोलिसांकडून त्यानंतर बेपत्ताची खबर सर्वच पोलिस ठाण्याना दिली.
त्यावेळी दोन दिवसापासून शिक्षक विजयकुमार गुरव हे बेपत्ता असल्याचे पुढे आले त्याचा शोध घेत असतना ऐकामागोमाग असे क्लू सापडत गेले आणि पोलिसांनी आरोपी शिक्षक गुरव यांची पत्नी जयालक्षमी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे याच्या घटनेनंतर अवघ्या चार ते पाच दिवसातच मुसक्या आवळल्या त्यानंतर येथील सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत ची सुनावणी झाली आणि दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्हयात दोषी ठरवून ऑगस्ट 2022 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
आरोपी ना शिक्षेनंतर सिंधुदुर्ग तून कोल्हापूरला हलविले
मृत शिक्षक विजयकुमार गुरव यांची पत्नी जयालक्षमी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे या दोघांना जन्मठेप झाल्यानंतर कोल्हा पूर येथील कळंबा कारागृहात हलवण्यात आले होते.तेथे ते दोघे ही शिक्षा भोगत होते.असे असतनाच आरोपी सुरेश चोथे याने कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांचा विश्वास संपादन केला होता.
कार वॉशिंग करून लावायला गेला तो आलाच नाही
कोल्हापूर कळंबा कारागृहात कैदी क्रमांक ३८६ सुरेश चोथे हा ऑगस्ट २०२२ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो सध्या खुल्या कारागृहात होता. त्यामुळे त्याला कारागृहाबाहेरील कार वॉशिंग सेंटरवर कामाची जबाबदारी दिली होती. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तो एका कारची स्वच्छता करीत होता.स्वच्छ केलेली कार बाजूला लावण्याच्या निमित्ताने तीच कार घेऊन तो पसार झाला.
चोथे पसार झाल्याने घटनेला उजाळा
कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून पसार झालेल्या सुरेश चोथे याला सावंतवाडी पोलिसांनी पकडले होते.व गुरव हत्याकांडाचा तपास लावला होता.मात्र त्याच गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याने पुन्हा एकदा या घटनेला उजाळा मिळाला आहे.