Accused conditional bail in Saraswat bank embezzlement case | सारस्वत बँक अपहारप्रकरणी आरोपीस सशर्त जामीन

सारस्वत बँक अपहारप्रकरणी आरोपीस सशर्त जामीन

ठळक मुद्देसारस्वत बँक अपहारप्रकरणी आरोपीस सशर्त जामीनतक्रारीवरून गुन्हा दाखल

कणकवली : सारस्वत बँकेच्या वैभववाडी शाखेतील ३ कोटी ५१ लाख ३७ हजार रकमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील संशयित उपशाखाधिकारी कल्पेश अशोक महाडिक (रा . राजापूर) याची जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. २ आर. बी. रोटे यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्त जाचमुचलक्यावर मुक्तता केली आहे.

सन २०१४-२०२० या कालावधीत सारस्वत बँकेच्या वैभववाडी शाखेत उपशाखाधिकारी या पदावर कार्यरत असताना संशयित कल्पेश महाडिक यांनी आरोपी नं. १ प्रल्हाद मनोहर मांजरेकर याने तयार केलेल्या बनावट ह्यओडीह्ण कर्ज खात्यांची माहिती असतानाही ती मंजूर केली होती. तसेच प्रल्हाद मांजरेकर याने काही ओडी खात्यांची कर्जमर्यादा वाढविली असताना महाडिक यांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता त्याला मंजुरी दिली होती .

सहकर्मचारी मांजरेकर याने खातेदारांच्या नावे मोठ्या प्रमाणात रोख रकमा काढलेल्या व्यवहारांनाही महाडिक यांनी मान्यता दिली होती. काही कर्जदारांची बनावट कर्जखाती असतानाही त्याची खातरजमा न करता लाखो रुपयांच्या रकमा मांजरेकर यांच्या कुटुंबियांच्या नावे गैरप्रकारे हस्तांतरीत करतानाची मंजुरीही महाडिक यांनी दिली होती .

प्रतिक्षा बागवे यांच्या नावे बनावट ओडी खाते मांजरेकर याने सुरू केले होते. मांजरेकर याची कणकवली शाखेत बदली झालेली असताना व शाखाधिकारी सौमित्र प्रभू हे वैद्यकीय रजेवर असताना कल्पेश महाडिक याने प्रभारी शाखाधिकारी म्हणून काम करताना बागवे यांच्या खात्याची कर्जमर्यादा १ कोटी १६ लाख एवढी वाढविली होती .

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग केला होता. तपासादरम्यान, मांजरेकर याच्या अटकेनंतर महाडिक यालाही अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली होती. त्याच्यावतीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने महाडिक याची ५० हजारांच्या सशर्त जातमुचलक्यावर मुक्तता करताना अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, सरकारी पुराव्यात ढवळाढवळ करू नये अशा अटी घातल्या आहेत. संशयितातर्फे ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

तक्रारीवरून गुन्हा दाखल

तसेच त्या खात्यातून ५० लाख १३ हजार ४८ रुपये अचानक दुसऱ्या खात्यात अनाधिकारी वर्ग केले होते. याबाबत मांजरेकर याचेविरूद्ध बँक शाखाधिकारी निलेश वालावलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैभववाडी पोलीस स्थनकात गुन्हा दाखल केला होता. तपासात तत्कालीन शाखाधिकारी सौमित्र प्रभू व उपशाखाधिकारी अल्पेश महाडिक व मांजरेकर याची पत्नी यांनाही आरोपी करण्यात आले होते.

Web Title: Accused conditional bail in Saraswat bank embezzlement case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.