कणकवली बाजारपेठेत अपघात, बांद्यातील तरूण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 00:26 IST2019-04-19T00:26:28+5:302019-04-19T00:26:37+5:30
टाटा एस वाहनाने धडक दिल्याने बांदा येथील निर्भय लक्ष्मण मयेकर वय ५३ हे जागीच ठार झाले.

कणकवली बाजारपेठेत अपघात, बांद्यातील तरूण ठार
कणकवली : टाटा एस वाहनाने धडक दिल्याने बांदा येथील निर्भय लक्ष्मण मयेकर वय ५३ हे जागीच ठार झाले. हा अपघात आज रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कणकवली उबाळे मेडिकल समोर घडला
याबाबतची माहिती पोलीस हवालदार बाळू कांबळे यांनी दिली. नेमका अपघात कसा घडला याबाबत आपण सांगू शकत नाही ती गाडी आजरा येथील असल्याचे समजते. याची चौकशी सुरू आहे असे कांबळे यांनी सांगितले. श्री मयेकर हे सावंतवाडी तालुक्यातील बांद्यातील रहिवासी आहेत.ते पाटबंधारे खात्यात नोकरीला होते.